शिवसैनिकांनी ST कर्मचाऱ्यांची समजूत काढली; तासगाव आगारातून 'लालपरी' धावली!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 03:26 PM2021-11-20T15:26:12+5:302021-11-20T15:26:29+5:30
आज तासगाव आगारातून शिवसेना तासगावच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांची समजूत काढली व तासगाव सांगली, तासगाव मिरज, तासगाव विटा या मार्गावर नारळ फोडून एसटी सुरू केली.
आज तासगाव आगारातून शिवसेना तासगावच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांची समजूत काढली व तासगाव सांगली, तासगाव मिरज, तासगाव विटा या मार्गावर नारळ फोडून एसटी सुरू केली. शिवसेना शेतकरी नेते संदीप गिड्डे पाटील यांच्या पुढाकाराने शिवसेनेचे शिष्टमंडळ सकाळी आंदोलन स्थळी पोहोचले. सर्व पदाधिकाऱ्यांनी आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीय या प्रति सहानुभूती व्यक्त केली व एसटी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. या कर्मचारी संपादरम्यान काही राजकीय पुढारी जाणीवपूर्वक राजकीय भांडवल करून दुकानदारी करीत आहेत यामुळे कर्मचाऱ्यांची दिशाभूल होत असून कर्माचार्यांनी आडमुठे पणाची भुमिका न घेता कामावर हजर व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी शिवसेना शेतकरी प्रतिनिधी संदीप गिड्डे पाटील, तालुकाप्रमुख प्रदीप पाटील, तालुका संघटक जयवंत माळी, महिला आघाडी विधानसभा प्रमुख शोभाताई पिसाळ, युवासेना तालुकाप्रमुख नितीन राजमाने, महिला आघाडी तालुकाप्रमुख मनिषाताई पाटोळे, शहरप्रमुख विशाल शिंदे, युवासेना उपतालुकाप्रमुख अनिल दौंड.चिटनीस सुशांत यादव , प्रशांत गुंजले, प्रमोद सावंत, नितीन बाबर, तुषार धाबुगडे, केशव वाघमोडे, चिंतामणी यादव, आगारप्रमुख विरेंद्र होनराव, स्थानक प्रमुख सुनंदा देसाई, सहायक वाहतूक निरीक्षक राजू जाधव, सतिश पाटील, सुतार, फोंडे, सतिश पाटील, पोलिस निरीक्षक संजीव झाडे, पोलिस उपनिरीक्षक नामदेव तरटे यांचेसह एसटी चालक वाहक उपस्थित होते.