शिवसेनेची राज्यपाल भेटीची खेळी भाजपचं टेन्शन वाढवणारी !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 04:16 PM2019-10-31T16:16:24+5:302019-10-31T16:20:14+5:30

दोन्ही पक्ष एकमेकांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेना आमदार राज्यपालांना भेटायला गेले आहे. भाजपवर दडपण निर्माण करण्यासाठी ही सेनेची खेळी असल्याची चर्चा आहे.

Shiv Sena pulls BJP tension on governor's visit! | शिवसेनेची राज्यपाल भेटीची खेळी भाजपचं टेन्शन वाढवणारी !

शिवसेनेची राज्यपाल भेटीची खेळी भाजपचं टेन्शन वाढवणारी !

Next

मुंबई - राज्यभरात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या विवंचनेत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहे. त्यापाठोपाठ शिवसेनेने देखील शेतकऱ्यांसाठी हालचाल सुरू केली आहे. त्यासाठी सेना आमदार राज्यपालांच्या भेटीला गेले आहे. भाजपवर दडपण टाकण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.  

शिवसेनेने आजच गटनेत्याची निवड केली आहे. या निवडीनंतर शिवसेनेने तातडीने राज्यपालांची भेट घेण्याचे निश्चित केले आहे. राज्यपालांची भेट सरकार स्थापन करण्यापूर्वी प्रामुख्याने घेण्यात येते. मात्र शिवसेनेने नेता निवडीनंतर लगेचच राज्यपाल भगतसिंग कोशायरी यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

दुसरीकडे भाजपकडून अनेक पक्षातील नेते आमच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत असून यामध्ये शिवसेनेच्या नेत्यांचाही समावेश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुमच्या संपर्कात जे लोक आहेत, तेच आमच्याही संपर्कात असल्याचे राऊत म्हणाले. यावरून दोन्ही पक्ष एकमेकांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेना आमदार राज्यपालांना भेटायला गेले आहे. भाजपवर दडपण निर्माण करण्यासाठी ही सेनेची खेळी असल्याची चर्चा आहे.  

 

Web Title: Shiv Sena pulls BJP tension on governor's visit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.