“२५ वर्षे सत्तेत सडलो म्हणता, यांनी अडीच वर्षात वाट लावली त्याचं काय?”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 11:06 AM2022-07-19T11:06:12+5:302022-07-19T11:07:01+5:30

रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना सवाल. शरद पवारांनी डाव साधला, पक्ष फोडला : रामदास कदम

shiv sena ramdas kadam targets ncp sharad pawar ajit pawar political crisis maharashtra | “२५ वर्षे सत्तेत सडलो म्हणता, यांनी अडीच वर्षात वाट लावली त्याचं काय?”

“२५ वर्षे सत्तेत सडलो म्हणता, यांनी अडीच वर्षात वाट लावली त्याचं काय?”

googlenewsNext

शिवसेना नेते रामदास कदम यांनी अखेर आपल्या नेतेपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सोपवला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रामदास कदम नाराज असल्याची चर्चा होती. त्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडत असल्याचं चित्र निर्माण झाले. दरम्यान, यानंतर भावूक होत रामदास कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केला. आपल्या भावना व्यक्त करताना रामदास कदम भावूकही झाले होते. 

“आज शिवसेना प्रमुख असते तर तुम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन मुख्यमत्री होऊ दिलं असतं का? हे तुमच्या मनाला विचारून पाहा. बाळासाहेबांनी आपल्यासाठी कोणतंही पद घेतलं नाही. तुम्ही विचारसरणी बदललीत. आपला पक्ष वाढवून आमदार निवडून तुम्ही मुख्यमंत्रिपदी बसला असता तर आनंद झाला असता. भाजपनं २५ आपल्याला सडवली म्हणता, त्यांना २५ वर्ष लागली, पण यांनी अडीच वर्षात आपली वाट लावून टाकली त्याचं काय?,” असा सवाल रामदास कदम यांनी केला. टीव्ही ९ मराठीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजित पवारांनी अडीच वर्षांत वाट लावली त्याचा अभ्यास कोण करणार? असंही ते म्हणाले.

आता आम्ही अनिल परब यांचा फोटो केबिनमध्ये लावायचा का? अॅडव्होकेट जनरल झाले का?, त्यांचं योगदान काय, कोणत्या दंगलीत ते समोर गेले? कोणी फटके खाललेत, कधी सांगू, पण आता हकालपट्टी केलीये, असंही ते म्हणाले.

असं कधी वाटलंही नव्हतं

“५२ वर्षे मी कामं केलं पण माझ्यावर नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल असं कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. आयुष्याची संध्याकाळ अंधारमय होईल असं कधीच वाटलं नव्हतं" हे सांगताना रामदास कदम अत्यंत भावूक झालेले पाहायला मिळाले. "शरद पवारांनी डाव साधला, पक्ष फोडला" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. "मी खूप अस्वस्थ आहे. राजीनामा दिल्याने मी समाधानी नाही, आनंदी नाही. ५२ वर्षे लढणारा नेता राजीनामा का देतो? याचा विचार करायला हवा. दु:ख होतं वेदना होतात. मी प्रामाणिकपणे हात जोडून आपण राष्ट्रवादीसोबत बसू नका असं सांगितलं होतं,” असंही रामदास कदम म्हणाले.

Web Title: shiv sena ramdas kadam targets ncp sharad pawar ajit pawar political crisis maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.