रत्नागिरीमध्ये शिवसेनाच
By admin | Published: February 24, 2017 04:32 AM2017-02-24T04:32:56+5:302017-02-24T04:32:56+5:30
बंडखोरी आणि पक्षांतराचा फटका बसूनही शिवसेनेने रत्नागिरी जिल्हा परिषदेवरील आपले वर्चस्व
रत्नागिरी : बंडखोरी आणि पक्षांतराचा फटका बसूनही शिवसेनेने रत्नागिरी जिल्हा परिषदेवरील आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. प्रथमच स्वबळावर लढणाऱ्या शिवसेनेने जिल्हा परिषदेच्या ५५ जागांपैकी तब्बल ३९ जागा जिंकून रत्नागिरी जिल्हा आपलाच बालेकिल्ला असल्याचे दाखवून दिले. राष्ट्रवादीने १६ आणि काँग्रेसने केवळ १ जागा जिंकली. भाजपाला भोपळाही फोडता आला नाही. जिल्ह्यातील नऊपैकी पाच पंचायत समितींवर शिवसेनेने वर्चस्व मिळवले असून, राष्ट्रवादीने दोन पंचायत समिती मिळवल्या आहेत. अन्य दोन पंचायत समिती त्रिशंकू झाल्या आहेत.
इच्छुकांची संख्या असल्याने शिवसेनेत बंडखोरी झाली. काहींनी भाजपामध्ये जाऊन निवडणूक लढवली. मात्र कसलाही परिणाम न होता शिवसेनेने गतवेळेपेक्षा अधिक जागा जिंकल्या. रत्नागिरी (१0), संगमेश्वर (७) आणि लांजा (४) या तीन ठिकाणी सर्व जागा सेनेने जिंकल्या. दापोली, खेड, चिपळूण येथे राष्ट्रवादीने शिवसेनेच्या बरोबरीने यश मिळवले. गुहागरात राष्ट्रवादी आघाडीवर राहिली. काँग्रेसला राजापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेची एक जागा मिळाली. भाजपा शून्यावरच बाद झाला. रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर, राजापूर आणि खेड पंचायत समिती शिवसेनेकडे तर दापोली आणि गुहागर पंचायत समिती राष्ट्रवादीने जिंकली आहे. (प्रतिनिधी)
रत्नागिरी
पक्षजागा
भाजपा00
शिवसेना३९
काँग्रेस0१
राष्ट्रवादी१५
इतर00