युतीत शिवसेना छोटा भाऊ होण्यास तयार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 01:01 PM2019-09-10T13:01:19+5:302019-09-10T13:01:41+5:30

शिवसेना आपला जुना मित्रपक्ष असून युती कायम ठेवावी अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. 

Shiv Sena Ready to become younger brother for alliance with bjp | युतीत शिवसेना छोटा भाऊ होण्यास तयार ?

युतीत शिवसेना छोटा भाऊ होण्यास तयार ?

Next

मुंबई - शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती निश्चित असली तरी जागा वाटपावरून अद्याप एकमत झाले नाही. २०१४ मध्ये निवडणुकीच्या निकालावरून भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरला होता. आता शिवसेना-भाजप एकत्र आले आहे. त्यामुळे सहाजिकच छोटा-मोठा भाऊ नाट्य रंगणार अशी शक्यता होती. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना छोटा भाऊ संबोधून या वादावर पडदा टाकला. त्यानंतर शिवसेनाही छोट्या भावाच्या भूमिकेत जाण्यास तयार असल्याचे समजते.

भारतीय जनता पक्षाला अर्ध्या नव्हे तर त्यापेक्षा अधिक जागा देण्यासाठी शिवसेना तयार झाली आहे. यामध्ये भाजपला १५५ ते १५९ जागा देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. मात्र यात शिवसेनाही १२० पेक्षा कमी राजी नसल्याचे सांगण्यात येते. यामुळे घटक पक्षांची कुचंबना होण्याची शक्यता आहे.

दरम्यान २०१४ मध्ये शिवसेना पक्ष मोठ्या भावाच्या भूमिकेवर ठाम होता. त्यामुळे युती तुटली होती. परंतु, लोकसभा निवडणुकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिवसेना आणि भाजपची युती ठरली होती. तसेच ही युती विधानसभा निवडणुकीतही कायम राहिल असंही सांगण्यात आलं होतं. मात्र आता राज्यातील राजकीय स्थिती भाजपसाठी अधिक पोषक झाल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत भाजप अधिक जागा लढविण्याच्या भूमिकेत आहे. तर शिवसेना पक्षही छोटा भाऊ म्हणून निवडणुकीला सामोरा जाणार अशी शक्यता आहे.

भाजपमधून स्वबळाचा नारा

लोकसभा निवडणुकीतील एकतर्फी विजय आणि काश्मीरमधील कलम ३७० हटविल्यामुळे भाजपचा जनाधार वाढला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर सहज बहुमताचा आकडा गाठेल, असं भाजप नेत्यांच मत आहे. त्यामुळे पक्षातून स्वबळाचा नारा देण्यात येत आहे. मात्र शिवसेना आपला जुना मित्रपक्ष असून युती कायम ठेवावी अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. 

 

Web Title: Shiv Sena Ready to become younger brother for alliance with bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.