शिवसेना निवडणुकीसाठी कधीही तयार - रामदास कदम

By admin | Published: June 9, 2017 06:12 PM2017-06-09T18:12:37+5:302017-06-09T18:12:37+5:30

शिवसेना हा नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणारा पक्ष असून निवडणुकीसाठी आम्ही कधीही तयारच असतो़ योग्यवेळी योग्य निर्णय

Shiv Sena ready for elections - Ramdas step | शिवसेना निवडणुकीसाठी कधीही तयार - रामदास कदम

शिवसेना निवडणुकीसाठी कधीही तयार - रामदास कदम

Next

ऑनलाइन लोकमत
नांदेड, दि. 9 : शिवसेना हा नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणारा पक्ष असून निवडणुकीसाठी आम्ही कधीही तयारच असतो़ योग्यवेळी योग्य निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे सुचक वक्तव्य राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी नांदेडात केले़
नांदेड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीसाठी मंत्री कदम हे सकाळी रेल्वेने दाखल झाले़ शुक्रवारी दिवसभरात दोन टप्प्यात त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखांकडून मतदारसंघनिहाय आढावा घेतला़़
त्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत मंत्री कदम म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस एकीकडे शेतकऱ्यांसोबत असल्याचे सांगत आहे अन् दुसरीकडे पंतप्रधानांना भेटून सत्तेत घुसण्याची तयारी सुरु आहे़ शेतकरी आत्महत्येचे पाप हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असून त्यांनी महाराष्ट्र कर्जबाजारी केला़ सिंचनात ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला़, त्यांनी आम्हाला सल्ले देवू नयेत़
काँग्रेस - राष्ट्रवादीला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा अधिकार नाही़ एवढे वर्षे सत्तेत राहून त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? हा महत्वाचा प्रश्न आहे़ सेनेच्या लोकांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीकडून खिल्ली उडविण्यात येत आहे़ कारण सेनेने सत्तेतून बाहेर पडावे आणि राष्ट्रवादीने भाजपला साथ द्यावी अशी त्यांची खेळी आहे़ आपल्या कर्माच्या सर्व फायली बंद करण्यासाठीच राष्ट्रवादीला सत्तेत सामील व्हायचे आहे, असेही ते म्हणाले.
शिवसेना ही नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे़ त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढा देण्याची आमची तयारी आहे़ जर या राज्यात शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतील तर शिवसेना पक्षप्रमुख सत्तेला कधीही लाथ मारतील असेही मंत्री कदम यांनी सांगितले.

Web Title: Shiv Sena ready for elections - Ramdas step

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.