शिवसेनेने काढले नंदलाल ‘अस्त्र’!

By admin | Published: February 16, 2017 05:22 AM2017-02-16T05:22:57+5:302017-02-16T05:29:32+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार आणि पारदर्शी कारभारावरून शिवसेनेवर हल्लाबोल चढविला असतानाच आता शिवसेनेने

Shiv Sena removed Nandlal 'weapon'! | शिवसेनेने काढले नंदलाल ‘अस्त्र’!

शिवसेनेने काढले नंदलाल ‘अस्त्र’!

Next

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार आणि पारदर्शी कारभारावरून शिवसेनेवर हल्लाबोल चढविला असतानाच आता शिवसेनेनेही नागपूर महापालिकेतील भ्रष्टाचारावरून थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. फडणवीस महापौर असताना नागपूर महापालिकेत झालेले घोटाळे ज्येष्ठ सनदी अधिकारी नंदलाल यांच्या चौकशी अहवालात समोर आले होते, असा दावा शिवसेनेने आज केला.
आमदार अनिल परब यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांवर हल्ला केला. ते म्हणाले, फडणवीस महापौर असताना स्थायी समितीच्या सदस्यांनी कंत्राटदारासोबत परस्पर वाटाघाटी केल्या. निविदांविना ठरावीक कंत्राटदारांना काम दिल्याचा ठपका नंदलाल समितीने ठेवला होता. क्रीडा साहित्य, औषध खरेदी घोटाळे झाले
होते. या प्रकरणी काही नगरसेवकांना अटकही झाली. आपण केवळ आरोप करत नाहीत. अहवालाच्या आधारे बोलत आहोत, असे परब यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Shiv Sena removed Nandlal 'weapon'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.