'महाराष्ट्रावरील घाव हा राष्ट्रावरील, गुजरातपलिकडे दिल्लीश्वरांची झेप जात नाही;' शिवसेनेचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 07:48 AM2022-11-02T07:48:43+5:302022-11-02T07:49:13+5:30

महाराष्ट्राच्या नशिबी एक नपुंसक सरकार आले आहे व एकापाठोपाठ एक असे उद्योग पळविले जात आहेत, शिवसेनेचा निशाणा.

shiv sena saamna editorial slams bjp narendra modi cm eknath shinde fadnavis over maharashtra projects gujarat tata airbus vedanta foxconn | 'महाराष्ट्रावरील घाव हा राष्ट्रावरील, गुजरातपलिकडे दिल्लीश्वरांची झेप जात नाही;' शिवसेनेचे टीकास्त्र

'महाराष्ट्रावरील घाव हा राष्ट्रावरील, गुजरातपलिकडे दिल्लीश्वरांची झेप जात नाही;' शिवसेनेचे टीकास्त्र

Next

महाराष्ट्र आपल्या पायावर आणि हिमतीवर उभा आहे व राहील; पण इतर मागास राज्यांना विकासात सहभागी करून घेतले जात नसेल तर ‘सबका साथ, सबका विकास’ या मोदी घोषणेतील फोलपणा समोर येतो. रुपयातील 80 पैसे गुजरातला व 20 पैशांत सारा देश हे गणित ठरले असेल तर गुजरातला सोन्यानेच का मढवीत नाही? असा सवाल शिवसेनेने केला आहे.

आजही गुजरातच्या पलीकडे सध्याच्या दिल्लीश्वरांची झेप जात नाही. महाराष्ट्रावरील घाव हा राष्ट्रावरील घाव आहे. महाराष्ट्राच्या इज्जतीचे अपहरण हे राष्ट्रीय अस्मितेचे वस्त्रहरण आहे, पण आपले मिंधे मुख्यमंत्री निर्विकारपणे सांगतात, ‘‘भाजप सोबत आल्याने मी आज समाधानी आहे.’’ छान! महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले असे सेनापती बापट का सांगून गेले ते आता स्पष्ट झाले. मिंध्यांपासून महाराष्ट्राला वाचवा! असे म्हणत शिवसेनेने भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर टीकेचा बाण सोडला. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून जोरदार निशाणा साधला.

कायम्हटलेयअग्रलेखात?
महाराष्ट्राच्या नशिबी एक नपुंसक सरकार आले आहे व महाराष्ट्रातून एकापाठोपाठ एक असे उद्योग पळविले जात आहेत. वेदांता फॉक्सकॉनसारखा महत्त्वाचा प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता. साधारण दीड लाख कोटींची गुंतवणूक राज्यात होणार होती व एक लाखावर लोकांना रोजगार मिळण्याची खात्री होती. हा प्रकल्प पेंद्राने गुजरातकडे खेचून नेला. त्या धक्क्यातून महाराष्ट्र सावरत नाही तोच टाटा एअरबस हा बावीस हजार कोटींचा प्रकल्प ‘किडनॅप’ करून गुजरातेत नेल्याने महाराष्ट्रावर मोठाच आघात झाल्याचे यात म्हटलेय.

प्रकल्पांवरदिशाभूल
ते प्रकल्प ठरवून मोदी-शहांच्या गुजरातमध्ये पळवून नेले जात आहेत व त्या ‘किडनॅपिंग’वर राज्याचे मिंधे मुख्यमंत्री तोंडात मिठाची गुळणी धरून बसले आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करीत आहेत. महाराष्ट्रात येऊ घातलेले मोठे प्रकल्प ओरबाडून नेले जात आहेत आणि मिंधे-फडणवीस सरकार भरसभेत द्रौपदीचे वस्त्रहरण सुरू असताना सभेतील प्रमुख लोक जसे माना खाली घालून बसले होते तसे बसले आहे, असे म्हणत संपादकीयमधून जोरदार निशाणा साधलाय.

केसानेगळाकापावाअसाप्रकार
महाराष्ट्राला कंगाल बनविण्यासाठी व राज्याचा स्वाभिमान, अस्मिता खतम करण्यासाठीच महाराष्ट्रात मिंधे सरकार स्थापन झाले हे आता नक्की झाले. टाटा यांनी आजपर्यंत त्यांच्या सर्व प्रकल्पांसाठी महाराष्ट्राला प्राधान्य दिले. वेदांता फॉक्सकॉनने तर महाराष्ट्रात पायाभरणी करण्याची सर्व जय्यत तयारी केली होती, पण केसाने गळा कापावा तसे महाराष्ट्राच्या बाबतीत घडले. महाराष्ट्राची लूट करून गुजरातला मालामाल करण्याच्या बोलीवरच दिल्लीश्वरांनी श्री. मिंधे महाशयांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केलेले दिसते. आज जे जे काही नवे घडविले जात आहे ते सर्व फक्त गुजरातलाच नेण्याचा प्रयत्न राष्ट्रीय एकात्मता व विकासाच्या समतोलास बाधा आणणारे आहे, असे यात नमूद करण्यात आलेय.

Web Title: shiv sena saamna editorial slams bjp narendra modi cm eknath shinde fadnavis over maharashtra projects gujarat tata airbus vedanta foxconn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.