'तेरा घमंड चार दिन का है पगले...', संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 01:39 PM2022-06-19T13:39:36+5:302022-06-19T14:24:41+5:30

'कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती. जगाच्या पाठिवर असा मूर्ख निर्णय कोणत्याच राज्यकर्त्याने घेतला नाही.'

Shiv Sena; Sanjay Raut; 'Tera ghamand char din ka hai pagle ...', Sanjay Raut's attack on BJP | 'तेरा घमंड चार दिन का है पगले...', संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

'तेरा घमंड चार दिन का है पगले...', संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

googlenewsNext

मुंबई: आज शिवसेनेचा 56वा वर्धापणदिन आहे. यानिमित्त मुंबईत मोठा कार्यक्रम होत आहे. यावेळी शिवसेने नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ''राज्यसभेची एक जागा जिंकली म्हणजे जग जिंकले किंवा महाराष्ट्र जिंकला असं नाही. तुम्ही एक जागा जिंकली, पण या राज्याची सूत्र शिवसेनेकडे, उद्धव ठाकरेंकडेच असतील. फार घमंड करू नका, 'तेरा घमंड चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है.' या बादशाहीला नख लावण्याची हिंम्मत अजून कोणाचीच नाही, असा इशारा राऊत यांनी यावेळी दिला. 

'असा मूर्ख निर्णय कोणी घेतला नाही'
राऊत पुढे म्हणाले की, "आज संपूर्ण देश अग्निवीर योजनेवर बोलतोय. सैन्यामध्ये आता कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती करणार आहेत. चार वर्षाचे कंत्राट, जगाच्या पाठीवर असा मूर्ख निर्णय कोणत्याच राज्यकर्त्याने घेतला नसेल. तुघलक होता, त्यानेही असा निर्णय कधी घेतला नव्हता. देशाचे रक्षण कोणी करायचे, हे ज्याला कळत नाही, त्यांच्या हातात देशाची सूत्र आहेत. ठेकेदारी पद्धतीने गुलाम नेमले जातात, सैन्य नाही," असे राऊत म्हणाले.

संबंधित बातमी- 'तेरा घमंड चार दिन का है पगले...', संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

'राज्य अशांत करण्याचा प्रयत्न'
"मोदी सरकारच्या निर्णयामुळे आज देशात अराजकता निर्माण झाली आहे. तरुण मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आला आहे. महाराष्ट्राही खदखदत आहेत, पण राज्याची सूत्र उद्धव ठाकरेंच्या हातात असल्यामुळे महाराष्ट्र शांत आहेत. ही सूत्र शिवसेनेकडे जोपर्यंत असेल, तोपर्यंत राज्य शांत राहणार. काहीजण राज्याला अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तुम्हाला ते जमणार नाही,' असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Web Title: Shiv Sena; Sanjay Raut; 'Tera ghamand char din ka hai pagle ...', Sanjay Raut's attack on BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.