“उद्धव ठाकरे मविआ सोडणारे होते, PM मोदींनाही भेटले पण...”; दीपक केसरकरांनी सगळे सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 04:00 PM2023-10-16T16:00:40+5:302023-10-16T16:06:46+5:30

महायुती न होण्यामागे एका माणसाचा मोठा रोल आहे, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

shiv sena shinde group deepak kesarkar claims that uddhav thackeray was about to leave maha vikas aghadi | “उद्धव ठाकरे मविआ सोडणारे होते, PM मोदींनाही भेटले पण...”; दीपक केसरकरांनी सगळे सांगितले

“उद्धव ठाकरे मविआ सोडणारे होते, PM मोदींनाही भेटले पण...”; दीपक केसरकरांनी सगळे सांगितले

Deepak Kesarkar News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेमहाविकास आघाडी सोडणार होते. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटही घेतली होती. मात्र, ही बातमी फोडण्यात आली आणि शरद पवारांना सांगितली, असा मोठा गौप्यस्फोट शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. 

मीडियाशी बोलतना दीपक केसरकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते. त्यासाठी मध्यस्थ होतो. उद्धव ठाकरे यांनी आघाडी तोडण्यासाठी आणि महायुतीत येण्यासाठी भाजपकडून १५ दिवसांचा अवधी मागून घेतला होता. पण यात कोण खलनायक होते हे आम्हाला माहिती नव्हते. सुनील तटकरे यांनी याबाबतचा खुलासा केला. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना न विचारता ही बातमी शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवली असे तटकरे म्हणाले. याचा अर्थ महायुती न होण्यात राऊत यांचा मोठा रोल आहे हे स्पष्ट होते, असा मोठा दावा दीपक केसरकर यांनी केला. 

आरक्षण कसे मिळावे हे मनोज जरांगे यांनी सांगावे

मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला डेडलाइन दिली आहे. याबाबत बोलताना, आमचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. आता आरक्षण कसे मिळावे हे मनोज जरांगे पाटील यांनी सांगावे. ओबीसींमध्ये आणखी एक जागा वाढली तर जागा कमी होतील. अनेक जिल्ह्यात ओपनच्या जागा शिल्लक नव्हत्या. त्या भरून घेतल्या आहेत. सरकारची आरक्षण देण्याची भूमिका आहे. आता सर्वांनी एकत्र बसावे. आरक्षण टिकण्यासाठी काय करता येईल ते सांगावे, असे आवाहन दीपक केसरकर यांनी 

दरम्यान, उद्धव ठाकरेंना पाकिस्तानवर बोलायचा अधिकार नाही. त्यांना हिंदुत्वावर बोलायचा अधिकार आहे का? त्यांनी हिंदुत्व सोडले आहे. राहुल गांधींना घाबरतातच पण स्टॅलिनच्या मुलालाही घाबरले आहेत. त्यामुळे त्यांना बोलायच अधिकार नाही. उद्धव ठाकरे यांनी मोदींवर टीका करणे सोडून द्यावे. मोदींना जग मानते. कॅनडाला धडा शिकवण्याची हिंमत त्यांनी दाखवली. मेक इन इंडियामुळे आपल्याकडे एवढी शस्त्रास्त्राची निर्मिती झाली की कुणी आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही, असा पलटवार केसरकर यांनी केला.
 

Web Title: shiv sena shinde group deepak kesarkar claims that uddhav thackeray was about to leave maha vikas aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.