Maharashtra Politics: “..तर मग बारामतीची तुमची सीट जाईल असं म्हणायचं का?”; शिंदे गटाचा शरद पवारांना थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 03:37 PM2023-03-06T15:37:31+5:302023-03-06T15:39:34+5:30

Maharashtra Politics: कसब्याच्या निकालावरुन देशात बदलाचा मूड आहे, असे समजायचे तर मग चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा पराभव झाला आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

shiv sena shinde group deepak kesarkar replied ncp chief sharad pawar over bypoll election pune 2023 | Maharashtra Politics: “..तर मग बारामतीची तुमची सीट जाईल असं म्हणायचं का?”; शिंदे गटाचा शरद पवारांना थेट सवाल

Maharashtra Politics: “..तर मग बारामतीची तुमची सीट जाईल असं म्हणायचं का?”; शिंदे गटाचा शरद पवारांना थेट सवाल

googlenewsNext

Maharashtra Politics: कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालावर अद्यापही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या पोटनिवडणुकीच्या निकालावर भाष्य केले आहे. यानंतर आता शिंदे गटाकडून शरद पवार यांना प्रत्युत्तर देताना थेट प्रश्न विचारण्यात आला आहे. 

महाराष्ट्रात लोकांना बदल हवा आहे. कसब्याच्या निकालावरून देशात बदलाचा मूड असल्याचे स्पष्ट होत आहे. लोकांना चेंज हवा आहे, हे या निकालातून दिसून येत आहे. त्यासाठी लोकांनी एकत्र यायला हवे. रवींद्र धंगेकर यांनी मागील तीस वर्षे जे काम केले त्याला लोकांनी मते दिली, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. यावर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शरद पवारांना थेट सवाल करत डिवचले आहे. 

..तर मग बारामतीची तुमची सीट जाईल असे म्हणायचे का?

कसब्याच्या निकालावरून जर देशात बदलाचा मूड आहे असे समजायचे तर मग चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा पराभव झाला. मग बारामतीची तुमची सीट जाईल असे म्हणायचे का? पिंपरी-चिंचवडचा काही भाग बारामती मतदारसंघाचा भाग आहे. मग तुमची बारामतीची सीट जाईल असे आम्ही म्हणू का? पिंपरी-चिंचवड बालेकिल्ला असताना तुम्ही का पराभूत झालात, याचे आत्मपरीक्षण करा. कासब्यातील नाराजीचा फायदा तुम्हाला मिळाला. रवींद्र धंगेकर सातत्याने जनतेत होते म्हणू निवडून आले. आम्ही टिळक कुटुंबातील उमेदवार देऊ शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे. कासब्याच्या निकालाचा वर्षभर काय आनंद साजरा करायचा तो करा. वर्षानंतर मोदींची लाट कशी असते हे पुन्हा तुम्हाला दिसेल, या शब्दांत दीपक केसरकर यांनी रोखठोक मत मांडले. 

उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत मुख्यमंत्री राहा म्हणून सांगितले होते

उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत मुख्यमंत्री राहा म्हणून सांगितले होते. मात्र शरद पवार आणि राहुल गांधींवर तुमचा विश्वास होता. तुम्हाला वाटले कुणी पदावरून काढू शकत नाही. भाजपने तुम्हाला जवळ घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मोदींना तुम्ही खोटे बोलून फसवले, असा आरोपही दीपक केसरकर यांनी केला. तसेच मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी बाळासाहेबांनी जे केले ते मोदी विसरले नाहीत. तुम्ही मात्र एका मिनिटांत सगळे विसरले. सत्तेसाठी शिवसेना फोडणाऱ्यांसोबत गेलात, अशी टीका केसरकर यांनी केली.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये सभा झाली. या सभेला प्रयत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचीही खेडमध्ये सभा होणार आहे. केसरकर यांनी त्याची माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची येत्या १९ मार्च रोजी खेडला सभा होईल. तेव्हा या सभेला गर्दी होईलच, असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: shiv sena shinde group deepak kesarkar replied ncp chief sharad pawar over bypoll election pune 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.