“१० हजार टक्के एकनाथ शिंदेवर विश्वास, हाताच्या बोटावर मोजण्याइतके आमदार असलेले अफवा पसरवतात”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 10:11 AM2023-07-06T10:11:10+5:302023-07-06T10:12:11+5:30

Maharashtra Political Crisis: सगळ्यांचा विश्वास एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आहे. खोटी अफवा पसरवणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका, असे शिंदे गटाकडून सांगण्यात आले आहे.

shiv sena shinde group leader uday samant and shambhuraj desai reaction over claims of cm eknath shinde displeasure | “१० हजार टक्के एकनाथ शिंदेवर विश्वास, हाताच्या बोटावर मोजण्याइतके आमदार असलेले अफवा पसरवतात”

“१० हजार टक्के एकनाथ शिंदेवर विश्वास, हाताच्या बोटावर मोजण्याइतके आमदार असलेले अफवा पसरवतात”

googlenewsNext

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. यामुळे आता शिवसेना शिंदे गटातील काही आमदार नाराज झाले आहेत. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नागपूर दौरा सोडून मुंबईत परतावे लागले. एकनाथ शिंदे यांनी नाराज आमदारांची समजूत काढल्याचे सांगितले जात आहे. यातच आता हाताच्या बोटावर मोजण्याइतके आमदार असलेले लोक खोट्या अफवा पसरवत आहेत. आमचा १० हजार टक्के एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास आहे, असा विश्वास शिंदे गटाकडून व्यक्त करण्यात आहे. 

शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांनी एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या दाव्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली असून, भूमिका मांडली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आम्ही सगळे एकत्र लढवणार आहे. मुख्यमंत्री नाराज नाही, त्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. २०० पेक्षा जास्त आमदारांचे बहुमत आमच्याकडे आहे. सगळ्यांचा विश्वास एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आहे. ज्यांच्याकडे हाताच्या बोटावर मोजण्याइतके आमदार राहिले आहेत ते लोक आता मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची खोटी अफवा पसरवत आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, असे शंभुराज देसाई यांनी स्पष्ट शब्दांत सांगितेल. 

आमचा १० हजार टक्के एकनाथ शिंदेवर विश्वास

ही बातमी तुम्हाला कुठून समजली ते माहित नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करणारे आमदार किंवा खासदार नाराज नाहीत. आमचा १० हजार टक्के एकनाथ शिंदेवर विश्वास आहे. ज्या घडामोडी झाल्या आहेत त्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून विश्वासात घेऊन झालेल्या आहेत. मी ठामपणाने सांगू शकतो की लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच लढली जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी युती झाल्याने किंवा ते महायुतीमुळे आल्याने शिंदे गटात नाराजी आहे अशी काहीही चर्चाही झालेली नाही. कुणीही नाराज नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी दिली. 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात रात्री उशिरा आमदार आणि खासदारांची एक बैठक पार पडली. या बैठकीत आमदार आणि खासदारांसह आणि मंत्र्यांसह आगामी निवडणुकांची रणनीती ठरवण्यात आली आहे असंही स्पष्ट करण्यात आले. तसंच शिंदे गट नाराज आहे या फक्त अफवा आहेत. त्यावर कुणीही विश्वास ठेवायची गरज नाही, असेही ते म्हणाले.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: shiv sena shinde group leader uday samant and shambhuraj desai reaction over claims of cm eknath shinde displeasure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.