Maharashtra Politics: “शिवसेनेचे साम्राज्य उद्ध्वस्त होण्यामागे मूळ कारण संजय राऊत आहेत”; शिंदे गटाने सुनावले!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 03:41 PM2023-03-04T15:41:20+5:302023-03-04T15:41:48+5:30

Maharashtra News: अयोध्येत धनुष्यबाणाचे पूजन होईल, त्यानंतर राज्यभरात धनुष्यबाण यात्रा सुरू करणार असल्याची माहिती देण्यात आली.

shiv sena shinde group minister abdul sattar slams thackeray group mp sanjay raut | Maharashtra Politics: “शिवसेनेचे साम्राज्य उद्ध्वस्त होण्यामागे मूळ कारण संजय राऊत आहेत”; शिंदे गटाने सुनावले!

Maharashtra Politics: “शिवसेनेचे साम्राज्य उद्ध्वस्त होण्यामागे मूळ कारण संजय राऊत आहेत”; शिंदे गटाने सुनावले!

googlenewsNext

Maharashtra Politics: कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपला केवळ चिंचवड राखता आले. गेल्या ३० वर्षांपासून भाजपकडे असलेला गड महाविकास आघाडीने जिंकला. यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपवर टीका केली आहे. यासंदर्भात अद्यापही राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी कसब्याच्या पराभवाचे चिंतन मनन आवश्यक आहे. पराभवाचे मूळ कारण काय हे शोधले जाईल, असे म्हटले आहे. 

मीडियाशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. शिवसेनेचे साम्राज्य उद्ध्वस्त होण्यामागे मूळ कारण हे संजय राऊत आहेत. राजकारणाचे समीकरण कुठे जोडायचे कसे जोडायचे. काय बोलायचे कुठे बोलायचे. त्याचे परिणाम काय याची जाणीव न ठेवत ते बोलत असतात. संसदीय पदाच्या व्यक्तीबद्दल त्यांनी सन्मान ठेवायला पाहिजे. अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य करणे हे चुकीचे आहे. काहीही बोलून चालत नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल, असा इशारा अब्दुल सत्तार यांनी दिला आहे. 

विजय-पराजय होत राहतो

विजय-पराजय होत राहतो. कसब्याच्या पराभवाचे चिंतन मनन आवश्यक आहे. पराभवाचे मूळ कारण काय हे शोधले जाईल. भविष्यात ते पुन्हा होऊ नये याची दक्षता घेतल्या जाईल, असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले. तसेच सर्व सामान्य माणसापर्यंत तो संदेश जावा लोकांपर्यंत जाऊ. नव्याने पक्षप्रमुख झाल्याने त्याचा प्रचार प्रसार होण्यासाठी जनसंपर्क होईल. सर्वसामान्य माणसाची संवाद साधता येईल. त्यासाठी धनुष्यबाण यात्रा चालू होणार आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून यात्रा जाणार आहे, अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली.

अयोध्येत धनुष्यबाणाचे पूजन होईल 

एकनाथ शिंदे यांना पक्षप्रमुख म्हणून शिक्कामोर्तब निवडणूक आयोगाने केला आहे. त्याचे परिणाम भविष्याच्या निवडणुकीमध्ये दिसतील. येणाऱ्या निवडणुकीत या यात्रेचे मोठे योगदान ठरेल. निवडणूक आयोगाने चिन्ह दिले. पक्षाचे नाव दिले. त्याचा सर्वसामान्य माणसांपर्यंत संदेश जावा. अयोध्येत धनुष्यबाणाचे पूजन होईल. त्यानंतर नवीन पक्षप्रमुख झाल्यानंतर लोकांपर्यंत जाऊ, असे सत्तार यांनी सांगितले. 

दरम्यान, संजय राऊत यांच्या अटकेच्या मागणीवर ठाम असल्याचे सत्तार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. राज्यकर्त्यांबद्दल अपशब्द वापरल्यास कारवाई झाली पाहिजे. हेतुपुरस्पर अशा शब्दांचा वापर करणे योग्य नाही. संजय राऊत यांना उत्तर मागितले आहे. त्यानंतर कारवाई कशी होईल, हे ठरवले जाईल. संजय राऊत यांना अटक करावी. त्यांच्यावर कारवाई करावी, अशा वेगवेगळ्या मागण्या करण्यात आल्यात. विधानसभेचे अध्यक्ष काय कारवाई करतात. हे त्यांचे उत्तर आल्यानंतर कळेल, असे सूचक विधान सत्तार यांनी केले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: shiv sena shinde group minister abdul sattar slams thackeray group mp sanjay raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.