Maharashtra Politics: “संजय राऊतजी, आम्ही ५० जण एकदिलाचे आहोत, तुम्ही तुमचे उरलेले १५ सांभाळा” 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 02:56 PM2023-01-02T14:56:29+5:302023-01-02T14:57:35+5:30

Maharashtra News: संजय राऊतांकडे आता फक्त १५ जण राहिलेत. किती सांभाळता येतील ते सांभाळा, अशी टीका शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.

shiv sena shinde group sanjay gaikwad replied thackeray group sanjay raut | Maharashtra Politics: “संजय राऊतजी, आम्ही ५० जण एकदिलाचे आहोत, तुम्ही तुमचे उरलेले १५ सांभाळा” 

Maharashtra Politics: “संजय राऊतजी, आम्ही ५० जण एकदिलाचे आहोत, तुम्ही तुमचे उरलेले १५ सांभाळा” 

googlenewsNext

Maharashtra Politics: बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गट आणि शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे म्हणजेच ठाकरे गट यांच्यातील संघर्ष वाढताना दिसत आहे. दोन्ही गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला आता शिंदे गटातील नेत्याने प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊतजी, आम्ही ५० जण एकदिलाचे आहोत, तुम्ही तुमचे उरलेले १५ सांभाळा, असा टोला लगावला आहे. 

गद्दारांना परत विधानसभेत पाठवायच नाही, ज्या अर्थी दीपक केसरकरांना वाटत परत एकत्र यावे, अस त्यांना वाटत म्हणजे त्यांच्या गटात आणखी गट सुरू झाले आहेत, शिंदे गटाला आत्मपरिक्षणाची गरज नाही. शिंदे गटातील अर्धे आमदार भाजपमध्ये जातील.  त्यांना राज्याच नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे, त्यांनी व्यवस्थित काम करावे. भाजपने ही तात्पुर्ती तडजोड केली आहे. यांना भारतीय जनतेच्या पायरीवरही बसवले जात नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली. याला शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

संजय राऊतजी, आम्ही ५० जण एकदिलाचे आहोत

आमच्यात टोळी युद्ध नाही. थोडे-फार समज-गैरसमज सगळीकडेच असतात. संजय राऊतांकडे आता फक्त १५ जण राहिलेत. किती सांभाळता येतील ते सांभाळा. आम्ही ५० एका जीवाचे एका दिलाचे आहोत. आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. २०२४ ला आणखी किती येतात, तेही पाहा. हे सगळे अपात्र होणार, मनसे, प्रहारशिवाय पर्याय नाही, असे म्हणत होते. पण आम्ही सत्तेत आलो, आता न्यायालयात जे प्रकरण सुरु आहे, त्यात आम्हीच जिंकू, असा विश्वास संजय गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भाषणात तुमच्यासारखा पांचटपणा नसतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाने जनतेला भुरळ घातली आहे. जे कामाचे आहे, तेच बोलतात, असेही संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: shiv sena shinde group sanjay gaikwad replied thackeray group sanjay raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.