“संजय राऊतांमुळे शरद पवारांनी ठाकरे गटाला आपलेसे केले, आता ही अवस्था झाली”; शिंदे गटाची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 03:18 PM2024-05-28T15:18:20+5:302024-05-28T15:20:06+5:30
Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: शिवसेना आणि भाजपा युती मजबूत आहे. मुख्यमंत्री बदलले जाणार नाहीत. मुख्यमंत्री खंबीर आहेत, असे शिंदे गटाकडून स्पष्ट करण्यात आले.
Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: शिवसेना आणि भाजपा युती मजबूत आहे. मुख्यमंत्री कुठेही बदलले जाणार नाहीत. मुख्यमंत्री खंबीर आहेत. चोवीस तास काम करणारा हा मुख्यमंत्री आहेत. मराठा आंदोलन असो किंवा ओबीसी आंदोलन असो ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या समर्थपणे सांभाळली, असे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे सांगितले.
मीडियाशी बोलताना पुणे पोर्शे कार अपघातावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, पुणे हीट अँड रन प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. जनतेचा संताप पाहून राजकारण तापले आहे. पोलिसांवर दबाव आहे. त्यामुळे विरोधक ज्या प्रकारे आरोप करत आहेत. त्यामुळे संभ्रम निर्माण होत आहेत. पल्लवी सापळे यांच्यासंदर्भात आरोप असतील. तर त्याची चौकशी होणे आवश्यक आहे. पण ती व्यक्ती जर सक्षम असेल तर त्यांची चौकशी करण्यासाठी नियुक्ती केली असेल. आरोप करणे आणि तो सिद्ध होणे यात अंतर आहे, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.
मुख्यंत्री एकनाथ शिंदे अन् गजानन किर्तीकर भेटतील आणि निर्णय घेतील
आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, आमच्याकडे असलेल्या जागा आणि अजित पवार यांच्याकडे असलेल्या जागा वाटप सन्मानजनक होईल. तसेच गजानन किर्तीकर यांच्या वक्तव्यांनी शिवसैनिक नाराज आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गजानन किर्तीकर भेटतील आणि निर्णय घेतील, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शरद पवारांनी ठाकरे गटाला आपले केले. त्याला कारणीभूत संजय राऊत आहेत. शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे. त्यासााठीच ते एव्हढे ॲक्टिव्ह आहेत. अमित शाह हेच सांगत आहेत की, शरद पवारांनी जी गुगली टाकली, त्यामुळे ठाकरे गटाची ही अवस्था झाली आहे, असे टीका संजय शिरसाट यांनी केली.