“आम्हाला बोलायला लावू नका, आम्ही खोलात गेलो तर तुमचे कठीण होईल”; शिंदेसेनेचा राऊतांवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 15:52 IST2025-02-24T15:50:44+5:302025-02-24T15:52:29+5:30
Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: एकनाथ शिंदे यांनी राम मंदिरासाठी दिलेले १० लाख रुपये संजय राऊतांच्या घरी सापडले होते, चिठ्ठी सापडली होती. आता तिकिटासाठी पक्षाला किती पैसे देणार म्हणून विचारणारे तयार झाले आहेत, असे सांगत टीका करण्यात आली आहे.

“आम्हाला बोलायला लावू नका, आम्ही खोलात गेलो तर तुमचे कठीण होईल”; शिंदेसेनेचा राऊतांवर पलटवार
Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे, असा खळबळजनक आरोप शिंदेसेनेच्या नेत्या व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांनी केला आहे. दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमातील मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला. यानंतर संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका केली. या टीकेला आता शिवसेना शिंदे गटाकडून प्रत्युत्तर दिले जात आहे.
नीलम गोऱ्हे यांचे विधान म्हणजे त्यांची विकृती आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, कोणती बाई तुम्ही पक्षात आणली? जाताना ही बाई ताटात घाण करून गेली. नीलम गोऱ्हे ही निर्लज्ज बाई आहे, नमक हराम बाई आहे, भ्रष्ट आहे, हा असंवैधानिक शब्द नाही, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. याला शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी उत्तर देताना संजय राऊतांना थेट इशारा दिला आहे.
आम्हाला बोलायला लावू नका, आम्ही खोलात गेलो तर तुमचे कठीण होईल
कॉर्पोरेशनचे व्यवहार कसे होतात? कुठल्या हॉटेलमध्ये होतात, कोण-कोण असते तोडबाजीला? या सगळ्या गोष्टी सर्वांना माहिती आहेत. आरोप करायला काही लागत नाही. जे सत्य आहे, ते सर्वांना मान्य करावे लागेल. आजच्या घडीला जे काय चालले आहे, त्यामुळे तुमचा पक्ष रसातळाला गेला आहे. काल आलेला माणूस नेता होऊ शकतो, त्याला तिकीट मिळते. पण जो शिवसैनिक तुमच्यासोबत आहे त्याला तुम्ही तिकीट देऊ शकत नाहीत. तुम्ही स्वत:ला मर्द समजता? एक महिला काय बोलली, तिच्यावर तुटून पडता. आम्हाला बोलायला लावू नका. आम्ही खोलात गेलो, तर मुश्किल होईल, असा थेट इशारा संजय शिरसाट यांनी दिला आहे. तसेच संजय राऊत दररोज बडबड करतात. त्याच्या घरावर ईडीची रेड पडली होती. १० लाख घरी सापडले. चिठ्ठी सापडली. एकनाथ शिंदे यांनी ते पैसे राम मंदिरासाठी होते. रामाच्या नावावर दिलेले पैसे पुरले नाही. हे कसला स्वाभिमान सांगतात. किती जरी बोललात, तरी तुमचा सगळा पिक्चर लोकांसमोर आलेला आहे, असा पलटवार शिरसाट यांनी केला.
दरम्यान, गडाख त्यांच्या मंत्रिमंडळात तीन-चार मंत्री झाले. त्यांना विचारा. त्यांच्या वाढदिवसाला हे जायचे. आम्ही ४० वर्ष काम केलं, पण आम्हाला वाढदिवसाला साधा फोन नाही. एकनाथ शिंदे बोलतील, त्या दिवशी तुम्हाला कळेल कसे आणि कुठे-कुठे पैसे घेतले. आम्ही अभिमानाने आणि गर्वाने सांगतो की, शिवसेनाप्रमुख निवडणूक लढवताना विचाराचे की, बाळा तुझ्याकडे पैसे आहेत का, ते विचारायचे. काही मदत लागेल का? हे सेनाप्रमुख विचारायचे. आता तिकिटासाठी पक्षाला किती पैसे देणार म्हणून विचारणारे तयार झाले आहेत, अशी टीका करण्यात आली आहे.