“५० वर्षांत झाला नाही, तेवढा ५ वर्षांत बारामतीचा विकास करेन”; शिवतारेंचे पवारांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 03:04 PM2024-03-20T15:04:48+5:302024-03-20T15:05:09+5:30

Shiv Sena Shinde Group Vijay Shivtare News: बारामतीमध्ये दुसरी आडनाव नाहीत का? पवार नावाशिवाय दुसरा कोणी प्रतिनिधीत्व करु शकत नाही का? अशी विचारणा विजय शिवतारे यांनी केली आहे.

shiv sena shinde group vijay shivtare criticised ncp pawar group over baramati constituency lok sabha election 2024 | “५० वर्षांत झाला नाही, तेवढा ५ वर्षांत बारामतीचा विकास करेन”; शिवतारेंचे पवारांना आव्हान

“५० वर्षांत झाला नाही, तेवढा ५ वर्षांत बारामतीचा विकास करेन”; शिवतारेंचे पवारांना आव्हान

Shiv Sena Shinde Group Vijay Shivtare News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडत आहेत. यातच गेल्या ५० वर्षांत बारामतीचा विकास झाला नसेल, तेवढा ५ वर्षांत करून दाखवेन, असा एल्गार विजय शिवतारे यांनी केला आहे. 

४१ वर्ष आम्हाला परत परत मतदान करायला लावले. बारामतीमध्ये दुसरी आडनाव नाहीत का? पवार नावाशिवाय दुसरा कोणी प्रतिनिधीत्व करु शकत नाही का? बारामतीत हजारो आडनावे आहेत, ते का नको? आम्ही परत पवारांना का मतदान करायचे? आम्हाला काय दिले? सर्व प्रकल्प बारामती शहरात आणले. बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात प्यायला पाणी नाही. कसला विकास केला तुम्ही? अशी प्रश्नांची सरबत्ती विजय शिवतारे यांनी केली. 

माझी अजितदादांवर नाराजी नाही

माझी अजित पवार यांच्यावर नाराजी नाही. माझ्या मतदार संघातील लोकांची नाराजी आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना भोरमध्ये सगळी काम ठप्प झालेली. कारण निधीवाटप चुकीच होते. भोरच्या जनतेसाठी मुख्यमंत्र्यांना सांगून विकास कामांवरची स्थगिती उठवली. लोकांची काम झाली पाहिजेत, असे विजय शिवतारे यांनी म्हटले आहे. तसेच बारामतीमधील मतदारांना तिसरा पर्याय दिला पाहिजे, यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, त्यांना भेटणे, विश्वासात घेणे, मुख्यमंत्र्यांच्या भावना त्यांना कळवणे. या सगळ्यांचा, जनतेचा निर्णय महत्त्वाचा आहे, असे शिवतारे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, बारामतीत ६ लाख ०८६ हजार मते पवारांच्या बाजूने आहेत. त्याचवेळी ५ लाख ५० हजार विरोधी मते आहेत. ज्यांना पवारांना मतदान करायची इच्छा नाही, त्यांना संधी उपलब्ध करुन दिली पाहिजे, असे विजय शिवतारे यांनी सांगितले.
 

Web Title: shiv sena shinde group vijay shivtare criticised ncp pawar group over baramati constituency lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.