राणेंना अटक होऊ शकते मग उद्धव ठाकरेंनाही अटक व्हावी; शिवसेना नेत्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 03:09 PM2023-04-08T15:09:18+5:302023-04-08T15:09:51+5:30

मी सांगेल ती पूर्वदिशा असं आभासी दुनियेत संजय राऊत वागत आहेत. २५ वर्ष सत्ता जाणार नाही असं राऊत म्हणत होते. त्यांचा आजार बळावत चालला आहे असा टोला पावसकरांनी लगावला. 

Shiv Sena spokesperson Kiran Pavaskar criticized Uddhav Thackeray and Sanjay Raut | राणेंना अटक होऊ शकते मग उद्धव ठाकरेंनाही अटक व्हावी; शिवसेना नेत्याची मागणी

राणेंना अटक होऊ शकते मग उद्धव ठाकरेंनाही अटक व्हावी; शिवसेना नेत्याची मागणी

googlenewsNext

मुंबई - मुख्यमंत्री असताना कुणालाही जेलमध्ये टाकायचे हे काम तुम्ही केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जेवताना अटक करून त्यांच्यावर गुन्ह्याची नोंद होते. हा सत्तेचा माज नव्हता का? तिरंग्याचा अपमान होत असेल तर मी कानाखाली वाजवली असती हे वाक्य ते बोलले. त्यांनी तसे केलेही नाही. बोलले म्हणून तुम्ही गुन्हा दाखल केला. मग देवेंद्र फडणवीसांना तुम्ही जे शब्द वापरले मग आता काय करायचं? राज्य शासनाने अगोदरच्या घटना पाहिल्या तर उद्धव ठाकरेंनाही अटक करावी अशी मागणी शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर यांनी केली. 

किरण पावसकर म्हणाले की, अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांची पार्टनरशिप काय आहे हे लोकांना कळणे गरजेचे आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्याला वेगळ्यापणाने कलाटणी दिली जाते. यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो असं म्हणतात. मात्र मातोश्रीच्या अपयशामागे एका पुरुषाचा हात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. संजय राऊत यांच्या कृपेने मातोश्रीचे अधोगती सुरू झाली आहे. मी ग्रेट आहे, मी सांगेल ती पूर्वदिशा असं आभासी दुनियेत संजय राऊत वागत आहेत. २५ वर्ष सत्ता जाणार नाही असं राऊत म्हणत होते. त्यांचा आजार बळावत चालला आहे असा टोला त्यांनी लगावला. 

तसेच खासदार नवनीत राणा यांच्या डोळ्यात पाणी आले. घरी आल्यावर मुलाने विचारले १४ दिवस तुला जेलमध्ये का राहावे लागले? हनुमान चालीसा पठण करणार हे बोलले, केले नाही. त्यांना जेलमध्ये टाकले. ही बेबंदशाही नाही का? खासदार-आमदाराला जेलमध्ये टाकण्याचं धाडस तुम्ही केले. मुख्यमंत्रिपदावरून उतरवले नसते तर आणखी किती काय केले असते. एका अभिनेत्रीने फॉरवर्ड मेसेज पोस्ट केला म्हणून तिला ४० दिवस आतमध्ये राहावे लागले. तुमचे स्टुडिओ तोडले म्हणून बोलता पण अभिनेत्री कंगना रणौतच्या घराचं छप्पर तुम्ही तोडले. लोकांनी शाबासकी द्यायची का? यांचेच सगळ्यांचे श्राप मातोश्रीला लागले अशी टीका पावसकरांनी ठाकरेंवर केली. 

दरम्यान, एकाच घरात राहायचं, मातोश्रीवर राहायचे, शिवसेना आमदारांच्या मतांवर खासदार व्हायचे. गुण मात्र दुसऱ्या पक्षाचे गायचे हेच इतके वर्ष सुरू होते. आमच्यावर कुणी विश्वास ठेवत नव्हते. शेवटी ही आजारी व्यक्ती आहे. आभासी दुनियेत जगतात. आजारी असल्याने काहीतरी बरळले असेही कदाचित म्हणू शकतील अशा शब्दात पावसकरांनी संजय राऊतांचा समाचार घेतला. 

Web Title: Shiv Sena spokesperson Kiran Pavaskar criticized Uddhav Thackeray and Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.