Maharashtra Political Crisis: “नवनीत मॅडमचं म्हणजे याचं दार त्याचं दार, बाई माझ्या तोंडात मार”; सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 04:12 PM2022-08-27T16:12:48+5:302022-08-27T16:14:19+5:30

Maharashtra Political Crisis: शिवसेनेने कुणाशीही युती केली तरी ते यशस्वी होणार नाहीत. कारण उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही, अशी बोचरी टीका नवनीत राणांनी केली होती.

shiv sena sushma andhare replied mp navneet rana over criticism on uddhav thackeray after alliance with sambhaji brigade | Maharashtra Political Crisis: “नवनीत मॅडमचं म्हणजे याचं दार त्याचं दार, बाई माझ्या तोंडात मार”; सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर

Maharashtra Political Crisis: “नवनीत मॅडमचं म्हणजे याचं दार त्याचं दार, बाई माझ्या तोंडात मार”; सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर

Next

Maharashtra Political Crisis: राज्यभरातून एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde) वाढता पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच आता शिवसेनेने संभाजी ब्रिगेडशी युती करत शिंदे गटासमोर नवे आव्हान उभे केल्याची चर्चा आहे. यावरून राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झटत असून, खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या टीकेवर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सणसणती प्रत्युत्तर दिले आहे. 

उद्धव ठाकरेंनी कुणाशीही युती केली तरी ते यशस्वी होणार नाहीत. त्यांच्यामध्ये दम नाही. तसे असते तर ते घरी बसले नसते, अशी बोचरी टीका नवनीत राणा यांनी केली होती. या टीकेवर सुषमा अंधारे यांनी पलटवार केला आहे. आमच्या गावाकडे एक म्हण आहे, 'ह्याचं दार त्याचं दार बाई माझ्या तोंडात मार' आपला मतदारसंघ सोडून दारोदार हनुमान चालिसा म्हणत फिरण्यापेक्षा एकाच ठिकाणी राहून संपूर्ण राज्याला कोरोनासारख्या महामारीतून वाचवणे हे जास्त पुण्याचे काम आहे आणि ते उद्धव साहेबांनी चोखपणे पार पाडलेय, असे सुषमा अंधारे यांनी नमूद केले. 

लावारिस पेड ट्रोलर्सना कामाला लावायला दम लागतो नवनीत मॅडम

उद्धवजी त्यांच्या घरात महाराष्ट्रात होते. त्यांचं टुरिंग टॉकीज नाही - सुरत, गुवाहाटी, गोवा आणि दिल्लीत जाऊन चौकिदारी करायला. उलट महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचे राज्यपाल, देशाचे पंतप्रधान, केंद्रीय गृह मंत्री, गुजरात - आसाम - गोवा अशा तीन तीन राज्यांची गृह मंत्रालय, एका राष्ट्रीय पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष, १०५ आमदार, ४० बंडखोर, ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग आणि हजारो लावारिस पेड ट्रोलर्स यांना कामाला लावायला फार दम लागतो नवनीत मॅडम, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी नवनीत राणांवर हल्लाबोल केला आहे. 

दरम्यान, मनसेनेही शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. मनसे नेते आणि आमदार राजू पाटील यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. राजू पाटील यांनी ट्विट करत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली…!, असे राजू पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 
 

Web Title: shiv sena sushma andhare replied mp navneet rana over criticism on uddhav thackeray after alliance with sambhaji brigade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.