Maharashtra Politics: “नवनीत राणांनी आधी आपल्या वडिलांना शोधावे, मग उद्धव ठाकरेंवर बोलावे”; ठाकरे गटाचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 11:33 AM2023-04-07T11:33:11+5:302023-04-07T11:34:16+5:30

Maharashtra News: उद्धव ठाकरे, तुमचा घमंड, गर्व देवानेच ठेचला, अशी टीका नवनीत राणा यांनी केली होती. याला ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले.

shiv sena thackeray group manisha kayande replied navneet rana criticism on uddhav thackeray | Maharashtra Politics: “नवनीत राणांनी आधी आपल्या वडिलांना शोधावे, मग उद्धव ठाकरेंवर बोलावे”; ठाकरे गटाचा पलटवार

Maharashtra Politics: “नवनीत राणांनी आधी आपल्या वडिलांना शोधावे, मग उद्धव ठाकरेंवर बोलावे”; ठाकरे गटाचा पलटवार

googlenewsNext

Maharashtra Politics: हनुमान जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना नवनीत राणा यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. या टीकेला आता ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. नवनीत राणा यांची उद्धव ठाकरेंवर बोलायची लायकी नाही, असे सांगत नवनीत राणा यांच्यावर सडकून टीका करण्यात आली. 

"उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी भाषण करतील, त्या जागेचं शुद्धीकरण करू", नवनीत राणांचा संकल्प

उद्धव ठाकरे, तुमचा घमंड, गर्व देवानेच ठेचला. तुम किस खेत की मुली हो?..५६ वर्ष ज्या घराण्यात तुम्ही जन्माला आला ते घर टिकवू शकले नाही. विचारधारा टिकवू शकले नाहीत. आमदार सांभाळू शकले नाहीत. ज्या विचारधारेसाठी बाळासाहेबांनी जीवाचे रान केले. रक्ताचे पाणी केले, ते टिकवू शकले नाहीत. महाराष्ट्र काय बाळासाहेब ठाकरेंच्या डोळ्यातही अश्रू असतील. त्यांची विचारधारा बुडवण्याचे काम मुलानेच केले अशा शब्दात खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला होता. याला आता ठाकरे गटाच्या मनिषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

उद्धव ठाकरेंबाबत बोलण्याची नवनीत राणांची लायकी नाही

नवनीत राणांनी पहिल्यांदा आपल्या वडिलांना शोधून काढावे. ते फरार असून, अद्याप पोलिसांना सापडले की नाही, याची माहिती नाही. त्यामुळे स्वत: केलेल्या भानगडी पहिल्यांदा सोडवाव्यात. नंतर शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलावे. उद्धव ठाकरेंबाबत बोलण्याची नवनीत राणांची लायकी नाही, या शब्दांत मनिषा कायंदे यांनी पलटवार केला आहे. 

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना, बावनकुळे काय बघून घेणार आहेत? महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला ओळखले आहे. तुम्ही महाराष्ट्रात खेळ केला असून, कपटकारस्थान रचत सरकार स्थापन केले. त्यामुळे शिवसेना कधीही तुमच्या धमक्यांना घाबरणार नाही, असे मनिषा कायंदे यांनी ठणकावून सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: shiv sena thackeray group manisha kayande replied navneet rana criticism on uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.