Maharashtra Politics: “पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर स्वागतच”; ठाकरे गटातील आमदाराने दिली खुली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 12:46 PM2023-01-13T12:46:38+5:302023-01-13T12:48:35+5:30

Maharashtra News: ठाकरे गटाने पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्यासाठी ऑफर दिल्याचे सांगितले जात आहे.

shiv sena thackeray group mla sunil shinde said if pankaja munde to come in the party we will welcome her | Maharashtra Politics: “पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर स्वागतच”; ठाकरे गटातील आमदाराने दिली खुली ऑफर

Maharashtra Politics: “पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर स्वागतच”; ठाकरे गटातील आमदाराने दिली खुली ऑफर

googlenewsNext

Maharashtra Politics: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना सातत्याने डावलले जात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतात. तसेच पंकजा मुंडे भाजपला सोडचिठ्ठी देऊ शकतात, याबाबतही राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जातात. मध्यंतरी पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून ऑफर असल्याचे सांगितले जात असतानाच शिवसेना ठाकरे गटातील आमदाराने पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याबाबत ऑफर दिल्याचे बोलले जात आहे. पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर स्वागतच आहे, असे या आमदाराने म्हटले आहे.  

ठाकरे गटातील आमदार सुनील शिंदे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. भाजपमध्ये अन्याय होत असेल तर पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावे, असे शिंदे यांनी म्हटले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे या मोठ्या नेत्या आहेत. त्यांचा पक्षही मोठा आहे. त्यामुळे त्यांनी काय मत व्यक्त केले, त्याच्याशी आमचा काहीच संबंध नाही, असेही शिंदे यांनी सांगितले.

पंकजा मुंडे यांच्यावर भाजपमध्ये अन्याय

पंकजा मुंडे या राज्यातील महत्त्वाच्या नेत्या आहेत. त्यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होतोय. आपण सर्वच ते पाहत आहोत. अर्थात ही त्यांची पक्षांतर्गत बाब आहे. त्यावर आम्ही काही बोलणार नाही. त्यांच्या कर्तृत्वाची नेहमीच आम्हाला कदर असेल. पण त्यांच्यावर अन्याय होत असेल आणि त्यांना जर शिवसेनेत यायचे असेल तर आम्ही त्यांचे स्वागतच करू, असे सुनील शिंदे यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुनील शिंदे यांनी केली आहे. राज्याचे गृहमंत्री वारंवर कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देत असतात. कुणाचाही मुलाहिजा बाळगणार नाही असे सांगतात. आता कर्तव्य पाळण्याची वेळ आली आहे. त्यांनी कर्तव्यात कसूर करू नये ही मुंबईकराची इच्छा आहे, असा टोला सुनील शिंदे यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, देश हुकूमशाही पद्धतीने चालवला जात आहे. तपास यंत्रणा केंद्राच्या दबावाखाली काम करत आहेत. विरोधकांनाच फक्त टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपमध्ये गेल्यावर सर्व पापे धुतली जात आहे. यावरून काय ते कळून येते, अशी टीका सुनील शिंदे यांनी केली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: shiv sena thackeray group mla sunil shinde said if pankaja munde to come in the party we will welcome her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.