Maharashtra Politics: “शरद पवार म्हणाले होते काँग्रेस-NCPचे दिग्गज नेते रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का?”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 11:57 AM2023-04-03T11:57:42+5:302023-04-03T12:02:41+5:30

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंच्या हाताखाली काम करणे शक्य नाही. हे शिवधनुष्य तुम्हीच पेला, अशी गळ शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना घातली होती.

shiv sena thackeray group mp arvind sawant big secret explosion about uddhav thackeray cm post and sharad pawar stand | Maharashtra Politics: “शरद पवार म्हणाले होते काँग्रेस-NCPचे दिग्गज नेते रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का?”

Maharashtra Politics: “शरद पवार म्हणाले होते काँग्रेस-NCPचे दिग्गज नेते रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का?”

googlenewsNext

Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात गौप्यस्फोटांची मालिका सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या केलेल्या अपमानाचा निषेध म्हणून सावरकर गौरव यात्रा काढली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वज्रमूठ सभा घेतली. यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी मोठा गौपस्फोट केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिग्गज नेते आहेत, ते रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का, असे शरद पवार म्हणाले होते. म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची गळ घातली, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. 

शरद पवार म्हणाले होते की, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री राहिलेले दिग्गज नेते आहेत. काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण असे दोन दोन मुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ, जयंत पाटील, अजित पवार यांच्यासारखे दिग्गज नेते आहेत. ते या रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का, अशी विचारणा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री करताना केली होती. 

हे शिवधनुष्य पेलण्याची गळ शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना घातली 

शरद पवारांनी असे म्हटले असतानाही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंचे नाव दिले होते. यानंतर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना गळ घातली. हे शिवधनुष्य उद्धव ठाकरेंनाच घ्यावे लागेल असे शरद पवार म्हणाले होते, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे, असा आग्रह शरद पवारांनी धरला होता. काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये अनेक दिग्गज नेते आहेत. त्यामुळे तुम्ही जे नाव सूचवत आहात, त्यांच्यासोबत काम करणे शक्य नाही, असे शरद पवार म्हणाले होते, असे अरविंद सावंत यांनी सांगितले.  

अरविंद सावंत यांचा यु-टर्न

शरद पवार यांनी रिक्षावाला शब्द वापरला का, याबाबत एबीपी माझाने अरविंद सावंत यांना प्रश्न विचारला. त्यावर बोलताना, महाविकास आघाडीची स्थापना होताना हीच वस्तुस्थिती होती. मुख्यमंत्री पदाबाबत अशीच चर्चा झाली होती. ते रिक्षावाले आहेत. त्यामुळे आम्ही तो शब्द वापरतो. हा शब्द शरद पवार यांनी वापरला नाही. शरद पवार असे शब्द वापरत नाहीत. ही शिवसैनिकांची भाषा आहे, असे सांगत अरविंद सावंत यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: shiv sena thackeray group mp arvind sawant big secret explosion about uddhav thackeray cm post and sharad pawar stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.