Maharashtra Politics: “६७ वर्षांत LICचे एका रुपयाचेही नुकसान झाले नव्हते, गेल्या ७ वर्षांत ५० हजार कोटी बुडाले”
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 02:57 PM2023-02-06T14:57:40+5:302023-02-06T14:58:40+5:30
Maharashtra Politics: अमृतकाळातील महाघोटाळा समोर आला आहे. विरोधक जो निर्णय घेतील, तो शिवसेनेला मान्य असेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Maharashtra Politics: हिंडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये सातत्याने घसरण होत आहे. गेल्या आठ ट्रेडिंग सत्रांमध्ये एकूण तोटा १० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे. अदानी समूहामुळे एलआयसी, एसबीआय, पतंजलि यांसह अनेकांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले असून, जनतेचा पैसा बुडाल्यावरून विरोधक संसदेतही आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. यातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
“जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी” एवढा विश्वास एलआयसीवर होता. गेल्या ६७ वर्षात एलआयसीचे एक रुपयांचे नुकसान झाले नव्हते. पंडीत जवाहरलाल नेहरू, लालबहादुर शास्त्री, इंदिरा गांधी, व्ही. पी. सिंह, नरसिंह राव, मनमोहन सिंह यांच्या काळात एलआयसीचे काहीच नुकसान झाले नाही. पण मागच्या सात वर्षात एलआयसीचे ५० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हा जनतेचा पैसा बुडाला आहे, तरीही सरकार म्हणत आहे ऑल इज वेल, हे निर्लज्जपणाचे लक्षण आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
या अमृतकाळातील महाघोटाळा समोर आला आहे
मृतकाळ म्हणून या वर्षाला सरकार म्हणत आहे. या अमृतकाळातील महाघोटाळा समोर आला आहे. या घोटाळ्यावर अधिवेशनात कोणती पावले टाकायची याबाबत विरोधक म्हणून निर्णय घेऊ. विरोधक जो निर्णय घेतील, तो शिवसेनेला मान्य असेल, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली. तसेच अदानी यांच्या विषयावर विरोधकांना प्रश्न विचारून उपयोग काय? हा प्रश्न देशाच्या पंतप्रधानांना विचारला गेला पाहिजे. या देशातील केंद्रीय तपास यंत्रणा लाख दोन लाख रुपयांसाठी विरोधकांच्या घरावर सीबीआय, ईडीच्या धाडी घालतात. पण मोठ्या घोटाळेबाजांना विचारले देखील जात नाही. पंतप्रधान याबाबत बोलायला तयार नाहीत. हा प्रश्न राष्ट्रहिताचा आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.
दरम्यान, योगी सरकारने अदानी समूहाला मोठा झटका दिला आहे. २५ हजार कोटींपैकी ५ हजार कोटी रुपयांचे एक टेंडर रद्द करण्यात आले आहे. शेअर बाजारातील घसरणीमुळे अदानी एंटरप्रायझेसला इंटरनॅशनल बॉन्ड आणि २०,००० कोटी रुपयांच्या FPO द्वारे सुमारे ५०० दशलक्ष डॉलर उभारण्याची योजना रद्द करावी लागली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"