Maharashtra Politics: “भाजपचे लोक ढोंगी आहेत, औरंगाबादचे नामांतर करण्याची त्यांच्यात हिंमत नाही”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 01:41 PM2023-02-16T13:41:58+5:302023-02-16T13:42:48+5:30

Maharashtra News: केंद्रात आणि राज्यात भाजपचे राज्य आहे. मग नेमकी अडचण काय आहे, अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे.

shiv sena thackeray group sanjay raut slams bjp and modi govt over aurangabad name change proposal | Maharashtra Politics: “भाजपचे लोक ढोंगी आहेत, औरंगाबादचे नामांतर करण्याची त्यांच्यात हिंमत नाही”: संजय राऊत

Maharashtra Politics: “भाजपचे लोक ढोंगी आहेत, औरंगाबादचे नामांतर करण्याची त्यांच्यात हिंमत नाही”: संजय राऊत

googlenewsNext

Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेकविध मुद्द्यांवरून राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. यातच आता नामांतराचा मुद्दा पुढे आला आहे. उस्मानाबाद शहराचे धाराशीव नामकरण करण्यास केंद्र सरकारने ‘ना हरकत पत्र’ दिले असून, औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजी महाराज असे नामकरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, भाजपाचे नेते नेमके कोणाला घाबरत आहेत. यावर निर्णय न घ्यायला कोणता कायदा आडवा येतो आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे राज्य आहे. मग नेमकी अडचण काय आहे? मूळात भाजपाचे लोक ढोंगी आहे. त्यांनी अलाहाबादचे नामांतर केले. मात्र, औरंगाबादचे नामांतर करण्याची त्यांच्यात हिंमत नाही, या शब्दांत संजय राऊतांनी हल्लाबोल केला. 

भाजप आता त्यावर भूमिका घ्यायला तयार नाही

संजय राऊत पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार असताना भाजपाचे नेते ‘हिंमत असेल तर औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करून दाखवा’, अशी गर्जना करत होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी हे नामांतर करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता हा प्रस्ताव केंद्र सरकारने रखडून ठेवला आहे. याचे कारण काय? औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धारशीव करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या सरकारने घेतला. मात्र भाजप आता त्यावर भूमिका घ्यायला तयार नाही, असे सांगत संजय राऊत यांनी टीका केली. 

दरम्यान, आसामने दिलेल्या जाहिरातीवरून शिंदे-फडणवीसांवर टीका करताना, आसामचे मुख्यमंत्री अशी जाहिरात देत असतील तर आपले सरकार या करत आहे? राज्याचे मुख्यमंत्री खोके घेऊन आसाममध्ये पाहुणे बनून गेले होते. त्याबदल्यात आसामला ज्योतिर्लिंग दिले का? हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे, या शब्दांत संजय राऊतांनी सुनावले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: shiv sena thackeray group sanjay raut slams bjp and modi govt over aurangabad name change proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.