Maharashtra Politics: “नवनीत अक्कांनी भगव्या रंगाची साडी नेसून डान्स केलाय, त्याची चर्चा का बरं नाही?”: सुषमा अंधारे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 01:02 PM2023-01-18T13:02:22+5:302023-01-18T13:04:22+5:30
Maharashtra News: नवनीत अक्काच्या त्या गाण्याची चर्चाच होत नाही, असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.
Maharashtra Politics: शाहरुख खानच्या पठाण चित्रपटातील बेशरम रंग गाण्यावरून मोठा वाद झाला. अनेकांनी यावर सडकून टीका केली. यातच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. एका कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यात सुषमा अंधारे बोलत होत्या. भगव्या रंगाची साडी घालून आमच्या नवनीत अक्कानी पण डान्स केला आहे. त्याची चर्चा का बरे नाही? अशी विचारणा सुषमा अंधारे यांनी केली.
सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर व्यक्त होताना काय काळजी घ्यावी, याचेही मार्गदर्शन केले. गेल्या दोन अडीच वर्षात विरोधकांनी चुकीचे नरेटिव्ह लोकांपुढे मांडले. उद्धव ठाकरे अडीच वर्ष घराबाहेर पडलेच नाही, असे सांगितले गेले. पण त्यात तथ्य आहे का? हे कुणी तपासलेच नाही. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षामधली दोन वर्ष कोरोनातच गेली, त्यावेळी घरातून बाहेर पडायला सर्वांवरच बंधने होती, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
नवनीत अक्कांनी भगव्या रंगाची साडी नेसून डान्स केलाय
पठाण नावाच्या चित्रपटातील एका गाण्यावरुन बराच वाद, चर्चा होतेय. दीपीका पुदकोणच्या त्या गाण्यात खान नावाचा कलाकार आहे, म्हणून गाण्यावर आक्षेप घेतला जातोय का? पण तशाच भगव्या रंगाची साडी घालून आमच्या नवनीत अक्कानी पण डान्स केला आहे. पण नवनीत अक्काच्या त्या गाण्याची चर्चाच होत नाही. का बरे? नवनीत अक्काच्या नावापुढे खान, शेख, तांबोळी असे काहीच नाही म्हणून का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.
दरम्यान, सुषमा अंधारे यांनी सोशल मीडिया आणि मीडियावर बारकाईने लक्ष ठेवावे, असे कार्यकर्त्यांना सांगितले. व्हॉट्सअप विद्यापीठातून तयार झालेल्या कार्यकर्त्यांवरही टीका केली. सोशल मीडियावर विरोधकांनी एक नरेटिव्ह बाजूला केले गेले आहे. देशाच्या पंतप्रधानांनी मागच्या आठ वर्षात एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. त्यावर कुणीही बोलायला तयार नाही, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"