Uddhav Thackeray : ... म्हणून बारसूसाठी माझ्याकडून पत्र दिलं गेलं, उद्धव ठाकरेंनी सांगितलं नेमकं काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 08:03 PM2023-05-06T20:03:05+5:302023-05-06T20:04:06+5:30

प्रकल्प येणार हे तुम्हाला माहित होते. आता हे नागोबा तिकडे मालक म्हणून बसलेत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य.

shiv sena uddhav balasaheb thackeray clears what happened barsu refinery mahad rally | Uddhav Thackeray : ... म्हणून बारसूसाठी माझ्याकडून पत्र दिलं गेलं, उद्धव ठाकरेंनी सांगितलं नेमकं काय झालं?

Uddhav Thackeray : ... म्हणून बारसूसाठी माझ्याकडून पत्र दिलं गेलं, उद्धव ठाकरेंनी सांगितलं नेमकं काय झालं?

googlenewsNext

“आज मी बारसूत गेलेलो, तिकडे माझं पत्र दाखवत होते. हो मी दिलं होतं. मला खोटं बोलता येत नाही. खोटं बोलण्याची गरज नाही, मी पाप केलं नाही. ही गद्दार उपऱ्यांच्या सुपाऱ्या घेऊन नाचतायत. यादीत उपऱ्यांची नावं आहेत. तिथल्या लोकांना मधाचं बोट लावून सोन्यासारख्या जमिनी घेतल्या. प्रकल्प येणार हे तुम्हाला माहित होते. आता हे नागोबा तिकडे मालक म्हणून बसलेत,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला. नाणारमध्ये आम्ही रिफायनरी होऊ दिली नाही. नंतर मला दिल्लीतून फोन आले. तिकडे गेलेले गद्दार माझ्याकडे यायचे, मोठा प्रकल्प आहे. जर विनाशकारी प्रकल्प असेल तर गुजरातला जाऊ द्या असं सांगितलं. तिकडे कोणाचा विरोध नाही, वस्त्या गावं नाही, ओसाड जमिन आहे. म्हणून माझ्याकडून पत्र देण्यात आलं. आता एकंदरीत पाहिलं तर तिकडून संमती आली आणि आपलं सरकार पाडलं गेलं, असंही त्यांनी नमूद केलं.

“अंतिम मंजुरी मी तिकडे जाईन, लोकांशी बोलेन, कंपनीला सांगेन प्रेझेंटेशन द्या, लोकांनी हो म्हटलं तर प्रकल्प येईल, नाही म्हटलं तर बाहेरचा रस्ता, हे का नाही सांगितलं जात. संपूर्ण पोलीस दल बारसूत उतरवलं आहे,” असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. महाडमध्ये आयोजित शिवगर्जना सभेत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

“आज मी सकाळी बारसूला जाऊन आलो. विशेष म्हणजे हा महाड मतदारसंघ आपला आहे. केवळ निवडणुकीपुरता नाही. भगव्याला कलंक लावण्याची कोणाची हिंमत नाही. इकडे जशी मतं आहेत तशी पवित्र मातीही आहेत. यात राजकारणात गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असा इशारा यावेळी उद्धव ठाकरेंनी दिला.

“आता आपल्याला मैदानं अपुरी पडतायत. अनेकांना वाटलं शिवसेना संपली, संपवली पाहिजे. काहींचा गैरसमज आहे तेच म्हणजे शिवसेना. त्यांना मोठी केलेली लोकं आज माझ्यासोबत आहेत. माझ्यावर टीका केल्याशिवाय त्यांना भाकर मिळत नाही असं वाटतंय,” असं उद्धव ठाकरे आपल्या सभेदरम्यान म्हणाले.

“जगताप कुटुंबीय काँग्रेसमधून आलं. काहींच्या भूवया उंचावल्या. काहींच्या पोटात गोळाही आला की पुढच्या निवडणुकीत आपलं डिपॉझिट जप्त. काँग्रेसमधून शिवसेनेत आले शिवसैनिकांचं काय होणार? आमच्यातला गद्दार घेऊन भाजपनं डोक्यावर नाही का चढवला,” असं ते म्हणाले. येत्या काही महिन्यांत आणखी काही जण येणार आहेत. मविआ म्हणून आपण पुढे जातोय म्हणजे आम्ही काँग्रेस फोडतोय का असं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

स्नेहल जगताप यांचा पक्षप्रवेश

स्नेहल जगताप यांनी अनेक समर्थकांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. “मी वडिलांचा हात धरून राजकारणात आले, त्यांची उणीव आज भासते. कोरोनानं त्यांना आमच्यापासून हिरावून घेतलं,” अशी आपल्या वडिलांची आठवण त्यांनी सांगितली. दरम्यान, यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंचे आभारही मानले. तसंच यावेळी निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचाच उमेदवार निवडून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: shiv sena uddhav balasaheb thackeray clears what happened barsu refinery mahad rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.