Maharashtra Politics: “न्याय आपल्या बाजूनेच होणार, ४० गद्दार राजकारणातून हद्दपार होणारच”: आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 07:26 PM2023-02-09T19:26:24+5:302023-02-09T19:27:43+5:30

Maharashtra Politics: युवकांचा रोजगार आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाई खोके गँगने हिरावली आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

shiv sena uddhav balasaheb thackeray group leader aaditya thackeray slams cm eknath shinde govt and shinde group in shiv samavd yatra | Maharashtra Politics: “न्याय आपल्या बाजूनेच होणार, ४० गद्दार राजकारणातून हद्दपार होणारच”: आदित्य ठाकरे

Maharashtra Politics: “न्याय आपल्या बाजूनेच होणार, ४० गद्दार राजकारणातून हद्दपार होणारच”: आदित्य ठाकरे

googlenewsNext

Maharashtra Politics: संविधानावर आमचा पूर्ण विश्वास आहे. न्याय आपल्या बाजूनेच होणार आणि ४० गद्दार हे राजकारणातून हद्दपार होणारच. युवकांचा रोजगार आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाई खोके गँगने हिरावली आहे. खोके गँग ही महाराष्ट्रद्वेषी आहे, टक्केवारीत अडकला आहे, या शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर घणाघाती टीका केली. 

आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आदित्य ठाकरे पुन्हा एकदा राज्यभरात जाऊन शिवसैनिकांची मोट मजबूत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. पैठण येथील शिवसंवाद यात्रेदरम्यान, आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार टीका केली. एकीकडे घाम गाळणारा शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित आहे तर दुसरीकडे राज्यात एकमेव शेतकरी ज्यांच्या शेतात २ हेलिपॅड उतरतात ते म्हणजे मंत्रालायत बसणारे मुख्यमंत्री, असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. 

गुजरात सरकारचे आभार मानायला उद्योगधंदे पळवले

ज्या सुरतला गद्दार लपून बसले होते. त्या सुरत व गुजरात सरकारचे आभार मानायला यांनी येथील उद्योगधंदे पळवले. युवकांचा रोजगार आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाई खोके गँगने हिरावली आहे. खोके गँग ही महाराष्ट्रद्वेषी आहे, टक्केवारीत अडकली आहे, या शब्दांत हल्लाबोल करत, आपले सरकार आल्यावर सपाट करून टाकू आणि महाराष्ट्राची विकासकामे गतिमान करू. निवडणुका लागतील तेव्हा संपूर्ण वातावरण भगवेमय होणार, असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला. 

दरम्यान, युवकांचा रोजगार आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाई खोके गँगनी दिली नाही. ही आव्हान न स्वीकारणारी खोके गँग आहे. मविआ सरकारच्या काळात आम्ही महाराष्ट्र पुढे नेत राज्याला सुवर्णकाळ दाखवण्याचा प्रयत्न करत असताना राक्षसी महत्त्वाकांक्षी असणाऱ्यांनी सरकार पाडले. ओला दुष्काळ जाहीर करा नाही तर खुर्च्या खाली करा या आमच्या मागणीनंतरही सत्ताधारी हे खुर्च्यांना चिकटून राहिले त्यामुळे त्यांना ओला दुष्काळ दिसला नाही, असे टीकास्त्र आदित्य ठाकरेंनी सोडले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: shiv sena uddhav balasaheb thackeray group leader aaditya thackeray slams cm eknath shinde govt and shinde group in shiv samavd yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.