मनसेच्या 'त्या' व्हिडिओला शिवसेनेचं बाळासाहेबांच्याच व्हिडिओतून प्रत्युत्तर; थेट राज ठकरेंवरच निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 07:47 PM2022-05-04T19:47:01+5:302022-05-04T19:47:18+5:30
सध्या शिवसेना आणि मनसे यांच्यातील कलगितुऱ्यामुळे राज्यातील राजकारण प्रचंड ढवळून निघत आहे. दोन्ही पक्षांत कोण सर्वाधिक प्रखर हिंदुत्ववादी? हे सांगण्याची स्पर्धाच लागल्याचे दिसत आहेत.
सध्या शिवसेना आणि मनसे यांच्यातील कलगितुऱ्यामुळे राज्यातील राजकारण प्रचंड ढवळून निघत आहे. दोन्ही पक्षांत कोण सर्वाधिक प्रखर हिंदुत्ववादी? हे सांगण्याची स्पर्धाच लागल्याचे दिसत आहेत. यातच, मनसेनेशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची भोंग्यांसंदर्भातील भूमिका दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत शिवसेनेवर निशाणा साधला होता. यानंतर आता शिवसेनेनेही मनसेला व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे.
मनसेच्या 'त्या' व्हिडिओला शिवसेनेचं बाळासाहेबांच्याच व्हिडिओतून प्रत्युत्तर; थेट राज ठकरेंवरच निशाणा#MNSVSshivsena#MNS#Shivsenapic.twitter.com/E0ECD0vqIa
— Lokmat (@lokmat) May 4, 2022
शिवसेनेने सोशल मीडियावर फिरवलेल्या या व्हिडिओंमध्ये, बाळासाहेब ठाकरे थेट राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर आणि भाषणाच्या शैलीवर टीका करताना दिसत आहेत. एका व्हिडिओत बाळासाहेब म्हणतात, या आमच्या पुतण्याने झक मारली. काय त्याच्या डोक्यात शिरलं काही कळत नाही. नेतृत्व, हे जे आहे ना हे दिसतंयना ना हे पाहा इथे. तर, मैदान कसं भरलं होतं हो? एवढं झालं होतं का? हे ना, हा फोटो नाही येणार वृत्तपत्रात, आमचाच येणार, हे दाखवा. हे दृश्य, हे शिवस्वरूप, हे शिवाचं रुप आहे, याला महत्व आहे, असे बाळासाहेब ठाकरे म्हणताना दिसत आहेत.
अरे तुमचा जन्म झाला नव्हता, तेव्हा मी मराठी काढलीय महाराष्ट्रात -
आणखी एका व्हिडिओत बाळासाहेब ठाकरे म्हणताना दिसत आहेत, "मी पूर्वी ज्या स्टाईलमध्ये बोलत होतो. अशी ही माझी स्टाईल कुणी तरी उचलली असं म्हणतात. मला माहीत नाही कुणी. म्हणजे मी माझ्या स्टाईलमध्ये उद्या बोललो, तर मी त्यांची कॉपी करतो, असे तुम्ही म्हणाल कदाचित. स्टाईल वगैरे ठिक आहे हो, विचार… विचार महत्त्वाचे आहेत. काही वाचन बिचन आहे का तुमचं? मराठी... मराठी... मराठी…, अरे तुमचा जन्म झाला नव्हता, तेव्हा मी मराठी काढलीय महाराष्ट्रामध्ये. ही साक्ष आहे त्याची."
मनसेच्या 'त्या' व्हिडिओला शिवसेनेचं बाळासाहेबांच्याच व्हिडिओतून प्रत्युत्तर#MNSVSshivsena#MNS#Shivsenapic.twitter.com/eNNBMo4maC
— Lokmat (@lokmat) May 4, 2022