Maratha Reservation: “संभाजीराजे मोठं व्यक्तिमत्त्व, नारायण राणेंनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे”; राऊतांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 03:49 PM2021-06-06T15:49:07+5:302021-06-06T15:51:00+5:30

Maratha Reservation: शिवसेनेकडून नारायण राणे यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

shiv sena vinayak raut replied narayan rane over maratha reservation and sambhajiraje | Maratha Reservation: “संभाजीराजे मोठं व्यक्तिमत्त्व, नारायण राणेंनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे”; राऊतांचा टोला

Maratha Reservation: “संभाजीराजे मोठं व्यक्तिमत्त्व, नारायण राणेंनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे”; राऊतांचा टोला

googlenewsNext

लांजा: सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधक भाजप अनेक मुद्द्यांवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कोरोना लसीकरण, कोरोना उपचार यांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणावरूननारायण राणे यांनी भाजपचेच खासदार असलेल्या संभाजीराजेंवर टीका केली आहे. मात्र, शिवसेनेकडून नारायण राणे यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. संभाजीराजे मोठं व्यक्तिमत्त्व, नारायण राणेंनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे, असा टोला राऊतांनी लगावला आहे. (shiv sena vinayak raut replied narayan rane over maratha reservation and sambhajiraje)

रत्नागिरीतील लांजा येथे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपचे दोन्ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासह खासदार नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला. मराठा आरक्षणासाठी एकीकडे भाजपचेच खासदार असलेले संभाजीराजे नवे आंदोलन उभे करत आहेत, तर दुसरीकडे नारायण राणे संभाजीराजेंच्या भूमिकेवर संशय घेत आहेत, असे विनायक राऊत म्हणाले. 

“संभाजीराजे माझे धाकटे भाऊ, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत”: उदयनराजे

नारायण राणेंनी संभाजीराजेंचा आदर्श घेतला पाहिजे

संभाजीराजे छत्रपती मोठे तसेच आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे. नारायण राजे स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलत असतात. तशी कारकीर्द संभाजीराजेंची नाही. संभाजीराजे आणि नारायण राणे यांची तुलना कधीही होऊच शकत नाही. संभाजीराजेंचा नारायण राणे यांनी आदर्श घेतलाच पाहिजे, अशी टीका राऊतांनी केली. तसेच भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सध्या काहीच काम नाही. दिल्लीवाल्यांनीदेखील फडणवीसांना बाजूला केले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना आता एकच काम राहिले आहे आणि ते म्हणचे ठाकरे सरकारवर टीका करणे. बाकी त्यांना काही काम नाही, असा आरोप राऊत यांनी केला आहे. 

“PM मोदींची हिटलरशी तुलना चुकीची, तेव्हा जर्मनी एक आर्थिक महासत्ता बनला होता”

राजे असतील तर रयत दिसली पाहिजे ना आजूबाजूला

ते राजे आहेत म्हणून त्यांना खासदारकी दिली. आता त्यांनी राजीनामा देऊ नये. मात्र, रायगडावर कोण आहेत हो? आंदोलन हे नेहमी लोकांमध्ये करावे. पण खासदारकी संपता संपता हे सगळे कसे आठवायला लागले. मला त्यांचा मुद्दा पटला तर मी जाईन. ते राजे असतील तर रयत दिसली पाहिजे ना आजूबाजूला. ती कुठे दिसत नाही. जिल्ह्या-जिल्ह्यात जाऊन कोणी नेता होत नाही, या शब्दांत भाजप नेते नारायण राणे यांनी खासदार संभाजीराजेंवर निशाणा साधला होता. 
 

Web Title: shiv sena vinayak raut replied narayan rane over maratha reservation and sambhajiraje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.