Shiv Sena vs. Eknath Shinde Live: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर दाखल; शिवसैनिकांचा जनसागर लोटला

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 08:47 AM2022-06-22T08:47:16+5:302022-06-22T22:31:06+5:30

Shiv Sena vs. Eknath Shinde Live Updates: शिवसेनेत बंडखोरीचं वादळ निर्माण झाल्यानंतर याचा नवा अंक आज गुवाहटीत पाहायला मिळत ...

shiv sena vs Eknath Shinde Live updates in marathi maharashtra government mva political crisis | Shiv Sena vs. Eknath Shinde Live: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर दाखल; शिवसैनिकांचा जनसागर लोटला

Shiv Sena vs. Eknath Shinde Live: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर दाखल; शिवसैनिकांचा जनसागर लोटला

googlenewsNext

Shiv Sena vs. Eknath Shinde Live Updates: शिवसेनेत बंडखोरीचं वादळ निर्माण झाल्यानंतर याचा नवा अंक आज गुवाहटीत पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसोबत आज पहाटे गुवाहटीला पोहोचले आहेत. गुवाहटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आमदारांना ठेवण्यात आलं आहे. आसाम विमानतळावर पोहोचताच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार सोबत असल्याचा दावा केला आहे. तर आणखी १० आमदार आज येणार असल्याचंही म्हटलं आहे. 

Shiv Sena vs. Eknath Shinde Live Updates:

LIVE

Get Latest Updates

10:38 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर दाखल; शिवसैनिकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन, घोषणाबाजी

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा बंगल्याहून मातोश्रीवर दाखल झाले असून, या परिसरात शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे. जोरदार घोषणाबाजी सुरू असून, शक्तिप्रदर्शन होताना दिसत आहे.

10:31 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर दाखल; शिवसैनिकांचा जनसागर लोटला

10:20 PM

वरळी सी-लिंकवरून उद्धव ठाकरे यांचा ताफा मार्गस्थ; थोड्याच वेळात मातोश्रीवर दाखल होणार

10:14 PM

रस्त्यात शिवसैनिकांना भेटत उद्धव ठाकरे मातोश्रीकडे

वर्षा बंगल्यावरून निघाल्यापासून रस्त्यामध्ये शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे. त्या शिवसैनिकांचे अभिवादन स्वीकारत, त्यांना भेटत उद्धव ठाकरे मातोश्रीकडे जात आहेत.

10:11 PM

अखेर उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला

फेसबुक लाइव्हमध्ये सांगितल्याप्रमाणे अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला आणि ताफ्यासह मातोश्रीच्या दिशेने रवाना झाले.

05:56 PM

मुंबई: तुमचे माझ्यावरील प्रेम असेच कायम ठेवा: उद्धव ठाकरे

05:55 PM

मुंबई: मी माझं मन घट्ट करून बसलो आहे: उद्धव ठाकरे

05:54 PM

मुंबई: तुम्ही सांगा आताच मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होतो: उद्धव ठाकरे

05:53 PM

मुंबई: या क्षणाला मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे: उद्धव ठाकरे

05:52 PM

मुंबई: केवळ मुख्यमंत्रीपद नाही, तर शिवसेना पक्षप्रमुख पद सोडायलाही तयार: उद्धव ठाकरे

05:52 PM

मुंबई: राजीनाम्याचं पत्र तयार ठेवतोय, मुंबईत यावं आणि राजभवनावर घेऊन जावं: उद्धव ठाकरे

05:50 PM

मुंबई: ज्यांना मी नकोय ते त्यांना प्रत्यक्ष समोर येऊन सांगावं: उद्धव ठाकरे
 

05:49 PM

मुंबई: मला मुख्यमंत्रीपदाचा मोह नाही, आताच वर्षावरून मातोश्रीवर जातो, मात्र समोर येऊन बोला: उद्धव ठाकरे

05:48 PM

मुंबई: माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको हवे असतील तर काय करायचं: उद्धव ठाकरे

05:46 PM

मुंबई: कोणताही अनुभव नसताना मुख्यमंत्रीपदाची मोठी जबाबदारी आली: उद्धव ठाकरे

05:46 PM

मुंबई: लघुशंकेला गेलेल्या आमदारावरही पाळत ठेवण्यात आली होती: उद्धव ठाकरे

05:45 PM

मुंबई: शिवसेना प्रमुखांना दिलेला शब्द पूर्ण करणारच: उद्धव ठाकरे

05:44 PM

मुंबई: मधल्या काळात जे तुम्हाला मिळालं ते बाळासाहेबांच्या शिवसेनेमुळेच मिळालं: उद्धव ठाकरे
 

05:43 PM

मुंबई: बाळासाहेबांचे विचार मी पुढे घेऊन जातोय: उद्धव ठाकरे

05:40 PM

बोलण्यासारखे बरेच मुद्दे आहेत: उद्धव ठाकरे

05:39 PM

सकाळी कोरोनाची टेस्ट केली ती पॉझिटिव्ह आली

सकाळी कोरोनाची टेस्ट केली ती पॉझिटिव्ह आली, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

05:09 PM

उद्धव ठाकरे यांचा फेसबुकच्या माध्यमातून संवाद

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फेसबुकच्या माध्यमातून संवाद सुरू होणार आहे

03:57 PM

मोठी खेळी! 'त्या' आमदारांवर वॉच ठेवण्यासाठी शिंदेचे ठाण्यातील सात मावळे, असं केलं प्लानिंग

01:37 PM

नितीन देशमुखांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

नितीन देशमुखांनी त्यांना जबरदस्तीनं सूरतला नेण्यात आल्याचा दावा केला. त्यावर आता एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "त्यांना जर जबरदस्तीनं आम्ही इथं आणलं असतं तर मग त्यांना आता सोडायला दोन माणसं कशाला पाठवली असती", असं एकनाथ शिंदे म्हणाले.

01:29 PM

उस्मानाबादचे कैलास पाटील देखील माघारी परतले

एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतला गेलेले उस्मानाबादचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील देखील माघारी परतले आहेत. आतापर्यंत शिवसेनेचे दोन आमदार परत आले आहेत.

01:17 PM

मी परत आलो, बाकिचेही येतील- नितीन देशमुख

"मी उद्धव ठाकरेंसोबतच आहे आणि राहणार. मी परत आलो आहे आणि बाकिचेही येतील अशी खात्री मला आहे. मी तिथं आमच्या मंत्र्यांसोबत गेलो होतो. पण मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. मी सुखरुप परतलो आहे", असं आमदार नितीन देशमुख म्हणाले.

01:07 PM

गुवाहाटीवरून परतलेल्या नितीन देशमुख यांनी मोठा आरोप

"मला जबरदस्तीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि जबरदस्तीनं इंजेक्शन टोचण्यात आलं. मला हार्टअटॅक वगैरे काही आलेला नाही. सर्व खोट्या बातम्या", असं गुवाहाटीवरून परतलेल्या नितीन देशमुख यांनी मोठा आरोप केला आहे. 

12:35 PM

काँग्रेसचे सर्व आमदार महाविकास आघाडीच्या पाठिशी- पृथ्वीराज चव्हाण

काँग्रेसचे सर्व आमदार संपर्कात असून सर्व महाविकास आघाडीच्या पाठिशी आहेत असा दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. 

12:05 PM

संजय राऊत यांचं सूचक ट्विट

राज्यातील घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेने असं सूचक ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

10:44 AM

राखेतून जन्म घेण्याची शिवसेनेची ताकद- संजय राऊत

राखेतून जन्म घेण्याची शिवसेनेची ताकद आहे. एकनाथ शिंदेंसोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी आम्हाला आणि आम्ही त्यांना सोडण्याची शक्यता नाही. शिवसेनेचे आमदार सध्या गुवाहाटीला जंगल सफारीसाठी गेले आहेत. आमदारांनी देश पाहायला हवा. पर्यटन करायला हवं. ते पर्यटन करुन माघारी परततील, असं संजय राऊत म्हणाले.

10:26 AM

सर्व आमदार स्वखुशीनं इथं आहेत- बच्चू कडू

"सर्व आमदार स्वखुशीनं इथं आले आहेत आणि सर्व आनंदी आहेत. सगळ्या आमदारांची आज मीटिंग होईल आणि संध्याकाळपर्यंत काय ते सर्व समजेल. या सर्व प्रकाराला चांगला प्रतिसादही मिळत आहे आणि शिवसेनेचे आणखी आमदार स्वत:हून इथं येण्यासाठी तयात आहेत. त्यांनाही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच सरकार नको आहे", असं बच्चू कडू म्हणाले. 

10:19 AM

खेडचे आमदार योगेश कदम नॉट रिचेबल

खेडचे  शिवसेनेचे आमदार योगेश कदम नॉट रिचेबल, आसामला गेल्याची चर्चा, निकटवर्तीयही फोन उचलेनात.

09:26 AM

मी कुणालाही मारहाण केलेली नाही- एकनाथ शिंदे

"मी कुणालाही मारहाण केलेली नाही. सर्व आमदार स्वखुशीनं सोबत आले आहेत. मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे. हिंदुत्वाच्या भूमिकेशी कोणताही तडजोड करणार नाही. कुणावरही टीका करायची माझी सवय नाही", असं एकनाथ शिंदे म्हणाले.

09:22 AM

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना कोरोनाची लागण

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना कोरोनाची लागण, आज सकाळी ते रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले आहेत. पुढील काही दिवस रुग्णालयात राहणार. टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा काम करतील. 

08:54 AM

सकाळी साडेनऊ वाजता बैठक

गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये सकाळी साडेनऊ वाजता बंडखोर आमदारांची बैठक होणार असून या बैठकीला एकनाथ शिंदे संबोधित करणार आहेत. 

08:53 AM

माझ्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार- एकनाथ शिंदे

माझ्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार असून आणखी १० आमदार आज सोबत येणार आहेत, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तसंच आम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व पुढे घेऊन जाण्यसाठी एकत्र आलो आहोत, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

08:51 AM

एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसोबत गुवाहाटीला

एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे इतर बंडखोर आमदार पहाटे गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये सर्वांचा मुक्काम आहे

Web Title: shiv sena vs Eknath Shinde Live updates in marathi maharashtra government mva political crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.