शिवसेना राज्यात शिवसंपर्क अभियान राबविणार, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची मोर्चेबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 05:27 AM2021-02-17T05:27:34+5:302021-02-17T05:28:03+5:30

Shiv Sena : राज्यातील ९० पेक्षा अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०२२ मध्ये होत असून त्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Shiv Sena will implement Shiv Sampark Abhiyan in the state, forming a front for local body elections | शिवसेना राज्यात शिवसंपर्क अभियान राबविणार, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची मोर्चेबांधणी

शिवसेना राज्यात शिवसंपर्क अभियान राबविणार, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची मोर्चेबांधणी

googlenewsNext

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळाल्याने आत्मविश्वास दुणावलेल्या शिवसेना पक्षनेतृत्वाने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. 
     राज्यातील ९० पेक्षा अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०२२ मध्ये होत असून त्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. संघटनात्मक उभारणीसाठी शिवसेना राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबविणार आहे. २४ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत हे अभियान राबविले जाईल.
वर्षा निवासस्थानी मंगळवारी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विशेष बैठक आयोजित केली होती. त्याला सुभाष देसाई, एकनाथ शिंदे हे मंत्री, विनायक राऊत आणि अनिल देसाई हे सेक्रेटरी, तसेच शिवसेनेचे बहुतांश खासदार, आमदार, जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख असे १०० नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
अभियानाच्या कालावधीत राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यात सेनेचा एक आमदार आणि एक खासदार फिरणार आहे. बुथ बांधणी कितपत झाली आहे, याची ते खातरजमा करतील. अभियानामार्फत महाविकास आघाडी सरकारच्या विकास योजना जनतेपर्यंत पोहोचवा, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत बजावले आहे. 
२०२२ मध्ये राज्यातील बहुतांश पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेनेवर होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावली असल्याच्या चर्चा होत्या. मात्र पूजा चव्हाण प्रकरणी किंवा वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासंदर्भात कोणताही उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला नाही, असे सेना आमदार दिलीप लांडे यांनी सांगितले.
 

Web Title: Shiv Sena will implement Shiv Sampark Abhiyan in the state, forming a front for local body elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.