पालघरमध्ये शिवसेना विजयी
By Admin | Published: February 17, 2016 03:35 AM2016-02-17T03:35:57+5:302016-02-17T03:35:57+5:30
पालघर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे अमित घोडा यांनी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र गावित यांचा १८ हजार ९४८ मतांनी पराभव केला.
पालघर : पालघर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे अमित घोडा यांनी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र गावित यांचा १८ हजार ९४८ मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे, तिरंगी लढत असतानाही या निवडणुकीत शिवसेनेच्या मतांमध्ये २० हजार मतांची भर पडली.
शिवसेनेचे आमदार कृष्णा घोडा यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. शिवसेनेने घोडा यांचे पुत्र अमित यांना उमेदवारी देऊन मतदारांची सहानुभूती मिळविली, तर काँग्रेसने राजेंद्र गावित यांनाच पुन्हा मैदानात उतरवून जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला. बहुजन विकास आघाडीने मनीषा निमकर यांना उभे करून ही लढत तिरंगी केली. याशिवाय, चंद्रकांत वरठा (माकप), दिलीप दुमाडा (बहुजन मुक्ती पार्टी) हेदेखील रिंगणात उतरले होते. शिवसेना आणि काँग्रेसने ही लढत प्रतिष्ठेची केल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. उमेदवारनिहाय मिळालेली मते अशी- शिवसेनेला (६७१२९ मते), काँग्रेसला (४८१८१ मते), बविआला (३६७८१ मते), माकपला (४८६५ मते) तर बहुजन मुक्ती पार्टीला (१४१७ मते) मिळाली. एकूण १ लाख ६१ हजार ५३५ मतदान झाले होते.
> तुलनात्मक विश्लेषण
उमेदवार२०१६टक्केवारी
अमित घोडा६७,१२९४१.५%
राजेंद्र गावित४८,१८१ २९%
मनीषा निमकर३६,७८१२२%
चंद्रकांत वरठा४,८६५३.२५%