कोणत्या यंत्रणेमुळे सेनेच्या 'त्या' नेत्यांना भरलीय धडकी !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 12:48 PM2019-07-05T12:48:59+5:302019-07-05T12:57:01+5:30

कितीही निष्ठावंत, वरिष्ठ नेते किंवा कार्यकर्ता असला तरी पक्षातील बेशिस्त आणि बेईमानी खपवून घेतली जाणार नाही, असा संदेश शिवसेनेकडून देण्यात येत आहे.

Shiv sena work on ground level with the help of Prashant Kishor | कोणत्या यंत्रणेमुळे सेनेच्या 'त्या' नेत्यांना भरलीय धडकी !

कोणत्या यंत्रणेमुळे सेनेच्या 'त्या' नेत्यांना भरलीय धडकी !

Next

मुंबई - २०१४ लोकसभा निवडणुकीपासून विविध राजकीय पक्षांच्या प्रचार यंत्रणेत मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. त्यामध्ये सोशल मीडिया महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असताना आता राजकीय रणनितीकारांची भूमिका निर्णायक ठरत आहे. त्यामुळे विविध पक्षांकडून राजकीय रणनितीकारांना नियुक्त करण्यात येत असून महाराष्ट्रात यामध्ये शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून बंडखोरीच्या पावित्र्यात असणाऱ्या आणि पक्षाला डोईजड होऊ पाहणाऱ्या नेत्यांना आवर घालण्यासाठी शिवसेनेने स्वतंत्र यंत्रणा उभारल्याचे समजते. त्यामुळे शिस्त न पाळणाऱ्या नेत्यांना धडकी भरणार आहे.

शिवसेनेने लोकसभा निवडणूक आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांची सेवा घेण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रशांत किशोर यांच्या संस्थेचे १०० हून अधिक पदाधिकारी निवडक लोकसभा मतदार संघात फिरत होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पक्षाचं काम न करणाऱ्या आणि आगामी काळात बंडखोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या नेत्यांची माहिती शिवसेना नेतृत्वाला मिळाली आहे. अशा नेत्यांना वेळीच वेसण घालण्यासाठी शिवसेनेने पावले उचलली आहे. त्यामुळे कोणत्याही नेत्यावर दुसऱ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कारवाई केली जात नसल्याचा संदेश पक्षात जाणार आहे. ही स्वतंत्र यंत्रणाच पक्षातील डोईजड नेत्यांना आवर घालणार हे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून संबंधीत जिल्ह्यातील नेत्यांवर कारवाई केली जात होती.

या यंत्रणेचे काम आढळराव पाटील यांच्या शिरूर मतदार संघातून दिसून आले आहे. प्रशांत किशोर यांच्या अहवालानंतरच शिरुर मतदार संघातील शिवसेना नेत्यांवर कारवाई करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर यांच्यानंतर जिल्हा परिषदेतील गटनेत्या आशा बुचके, जिल्हाप्रमुख राम गावडे यांच्यासह काही तालुका प्रमुखांवर केलेली कारवाई ही प्रशांत किशोर यांच्या संस्थेच्या अहवालानुसारच केल्याचे समजते. त्यामुळे कितीही निष्ठावंत, वरिष्ठ नेते किंवा कार्यकर्ता असला तरी पक्षातील बेशिस्त आणि बेईमानी खपवून घेतली जाणार नाही, असा संदेश शिवसेनेकडून देण्यात येत आहे.

 

Web Title: Shiv sena work on ground level with the help of Prashant Kishor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.