मनसेच्या 6 नगरसेवकांचा शिवसेनेतील प्रवेश अधिकृत 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 10:26 PM2018-01-25T22:26:01+5:302018-01-25T22:26:35+5:30

नगरसेवक पक्षांतर प्रकरणात कोकण विभागीय आयुक्तांनी मनसेला मोठा दणका दिला आहे. मनसेतून शिवसेनेत प्रवेशकर्ते झालेल्या मनसेच्या 6 नगरसेवकांच्या अधिकृत गटाला विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती समोर आली आहे.

Shiv Sena's admission to six Municipal Councilors of MNS | मनसेच्या 6 नगरसेवकांचा शिवसेनेतील प्रवेश अधिकृत 

मनसेच्या 6 नगरसेवकांचा शिवसेनेतील प्रवेश अधिकृत 

Next

मुंबई : नगरसेवक पक्षांतर प्रकरणात कोकण विभागीय आयुक्तांनी मनसेला मोठा दणका दिला आहे. मनसेतून शिवसेनेत प्रवेशकर्ते झालेल्या मनसेच्या 6 नगरसेवकांच्या अधिकृत गटाला विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती समोर आली आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसेकडून या नगरसेवकांवर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. तर या सहा नगरसेवकांनी कोकण आयुक्तांकडे वेगळ्या गटाची केलेली मागणी मान्य करण्यात आली आहे. 

मनसेतून शिवसेनेत गेलेले नगरसेवक : 

अर्चना भालेराव (वॉर्ड क्र. 126)

परमेश्वर कदम (वॉर्ड क्र. 133)

अश्विनी मतेकर (वॉर्ड क्र. 156)

दिलीप लांडे (वॉर्ड क्र. 163)

हर्षल मोरे (वॉर्ड क्र. 189)

दत्ताराम नरवणकर (वॉर्ड क्र. 197)

मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल = 227

शिवसेना अपक्षांसह - 84 +  4 अपक्ष = 88

भाजप अभासे आणि एक अपक्षासह - 83+अपक्ष 2= 85

कॉंग्रेस - 30

राष्ट्रवादी कॉंग्रेस - 9

मनसे - 7 (यातील 6 नगरसेवक आता सेनेत दाखल होतील)

सपा - 6

एमआयएम - 2

शिवसेनेत गेलेल्या सहाही नगरसेवकांना स्वतंत्र गट स्थापन करू देऊ नका - मनसे
मुंबई महानगर पालिकेतील मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत दाखल झाल्याप्रकरणी मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश अभ्यंकर यांनी कोकण भवनात जाऊन आयुक्त सामान्य प्रशासन विभागातील अधिका-यांची भेट घेतली होती. मनसेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत दाखल झालेल्या सहा नगरसेवकांना स्वतंत्र गट स्थापन करण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी यावेळी मनसेच्या नेत्यांनी केली होती. अशा आशयाचे निवदेन त्यांनी कोकण आयुक्त सामान्य प्रशासन विभागातील अधिका-यांना दिले होते.  

सत्तेसाठी रस्सीखेच : शिवसेनेकडे ८४ अधिक तीन अपक्ष व आता मनसेचे सहा असे ९४ नगरसेवक आहेत. भाजपाकडे ८२ अधिक दोन अपक्ष असे ८४ नगरसेवक आहेत. त्यात भाजपा नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे तेथे पोटनिवडणूक होईल. या प्रभागात भाजपाचे वर्चस्व असल्याने भाजपाचे संख्याबळ ८५ होईल. काँग्रेसचे दहा नगरसेवक फोडल्यास भाजपाकडे ९५ म्हणजे शिवसेनेपेक्षा एक नगरसेवक अधिक असेल. 

Web Title: Shiv Sena's admission to six Municipal Councilors of MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.