...तेव्हा शिवसेनेचीच रुग्णवाहिका होती-अमिताभ

By admin | Published: June 20, 2016 05:17 AM2016-06-20T05:17:45+5:302016-06-20T05:17:45+5:30

कुली चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान गंभीर जखमी झाल्यानंतर मला विमानाने मुंबईत आणण्यात आले होते. तेंव्हा मला विमानतळावरुन रुग्णालयात नेण्यासाठी केवळ शिवसेनेचीच रुग्णवाहिका उभी होती

Shiv Sena's ambulance was then ... Amitabh | ...तेव्हा शिवसेनेचीच रुग्णवाहिका होती-अमिताभ

...तेव्हा शिवसेनेचीच रुग्णवाहिका होती-अमिताभ

Next

मुंबई : कुली चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान गंभीर जखमी झाल्यानंतर मला विमानाने मुंबईत आणण्यात आले होते. तेंव्हा मला विमानतळावरुन रुग्णालयात नेण्यासाठी केवळ शिवसेनेचीच रुग्णवाहिका उभी होती, अशी आठवण अभिनेता अमिताभ बच्चन यांनी सांगितली.
शिवसेनेच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भारतरत्न लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, अभिनेत्री माधुरी दीक्षित आदींनी शिवसेनेला शुभेच्छा देत जागवलेल्या आठवणींची चित्रफीत दाखविण्यात आली.
मी आणि जया जेंव्हा पहिल्यांदा बाळासाहेबांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो तेंव्हा मार्इंनी जयाचे आपल्या सूनेसारखेच स्वागत केले होते. हा कौटुंबिक स्रेह
तसाच आहे, असे अमिताभ बच्चन यांनी सांगितले. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे शिवसेनेचे सूत्र असल्याचे सांगत शिवसेनेच्या ८० टक्के समाजकारणात मी सहभागी आहे, असे लता मंगेशकर म्हणाल्या. (प्रतिनिधी)

आम्ही आमचे बघून घेवू - उद्धव ठाकरे
देशात दरवर्षी कुठे ना कुठे निवडणुका असतात. या निवडणुका आता एकत्र घेण्याचा विचार करायला हवा. कारण, सततच्या निवडणुकांमुळे काहीजणांना आपले परदेश दौरे थांबवून भारतात यावे लागते. प्रचारसभा घ्यावा लागतात, असा चिमटाही उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता काढला.
पंतप्रधान आणि मुख्यमंत्री अशा घटनात्मक पदावरील व्यक्तींनी प्रचारात उतरायला नको. विधानसभा निवडणुकी दरम्यान मोदींनी महाराष्ट्रात तब्बल २७ सभा घेतल्या. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसाठी सारी यंत्रणा राबते. लोकांचाही घटनात्मक पदावरील व्यक्तीचे ऐकण्याकडे कल असतो. त्यामुळे त्यांनी सभा घेवू नयेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
नालायकांबरोबर सत्तेत राहू नका, असा सल्ला अलीकडेच शरद पवार यांनी दिला. पण आम्ही आमचे बघून घेवू, तुमच्या सल्लयांची गरज नाही. आजपर्यंत मी कधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली नाही. तुम्हीतर काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याला लकवा मारल्याचे विधान केले होते, याची आठवण उद्धव यांनी करून दिली.

Web Title: Shiv Sena's ambulance was then ... Amitabh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.