पैशांसाठी कोकणाला भस्मसात करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न- नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 04:02 PM2018-01-19T16:02:42+5:302018-01-19T16:03:08+5:30

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ते बोलत होते.

Shiv Sena's attempt to consume Konka for money- Narayan Rane | पैशांसाठी कोकणाला भस्मसात करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न- नारायण राणे

पैशांसाठी कोकणाला भस्मसात करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न- नारायण राणे

Next

मुंबईः महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ते बोलत होते. ते म्हणाले, रिफायनरी प्रकल्पाला माझा विरोध आहे. या प्रकल्पाद्वारे कोकणाला भस्मसात करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतक-यांना धमकावून जमिनी हिसकावल्या जातायत, वालम यांना मातोश्रीवर बोलावून धमकावलं गेलं आहे. शिवसेनेनं कोकणाच्या बाबतीत नेहमीच दुटप्पी भूमिका घेतली आहे.

रत्नागिरीतल्या नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला राणेंनी तीव्र विरोध दर्शवला आहे. हा प्रकल्प कोकणात आणण्याचा घाट शिवसेनेनं घातला आहे. 18 गावांतील जनतेचा, शेतकऱ्यांचा नाणार ग्रीन रिफायनरीला तीव्र विरोध असल्याचे राणे म्हणाले. कोकणात एकूण 13 हजार हेक्टर जमीन लागवडीखाली आहेत. या भागात 7 लाख आंब्यांची झाडं आणि 2 लाख काजूची झाडं आहेत, जगातला प्रसिद्ध देवगड आंबाही याच क्षेत्रातला आहे, असेही राणेंनी स्पष्ट केलं आहे.

सांडपाण्यामुळे मासेमारीचं मोठं नुकसान होण्याची भीतीही राणेंनी वर्तवली आहे. राज्याचे 'उद्योगी'मंत्री आणि केंद्रात अवजड उद्योगमंत्री शिवसेनेचेच आहेत. उद्धव ठाकरेंचा विरोध असेल तर तुमच्या मंत्र्यांनी प्रस्ताव मान्य का केला?, जमीन अधिग्रहणाला मान्यता का दिली?, असा सवाल राणेंनी उपस्थित केला आहे.  सात पिढ्या बसून खाईल इतके पैसे मिळतील, असं पत्र वालम यांना देण्यात आलं. त्यांच्या पत्नीवरही केसेस टाकल्या, छळ केला. वालम यांना ‘मातोश्री’वर बोलवून दम दिला जातो आहे, असे गंभीर आरोप नारायण राणेंनी केला.

Web Title: Shiv Sena's attempt to consume Konka for money- Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.