हर हिंदुकी एकही पुकार, पहले मंदिर फिर सरकार; अयोध्या दौऱ्यापूर्वी शिवसेनेचा नवा नारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 05:21 PM2018-11-18T17:21:55+5:302018-11-18T17:22:26+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या येत्या 25 नोव्हेंबरच्या अयोध्या दौऱ्याची शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे.
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या येत्या 25 नोव्हेंबरच्या अयोध्या दौऱ्याची शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मान्यवर शिवसेनेचे नेते यांची आताच सेनाभवन येथे येत्या 25 नोव्हम्बर रोजी अयोध्या दौऱ्याच्या तयारीची माहिती देण्यासाठी महत्वाची बैठक पार पडली.यावेळी राज्यातील शिवसेनेचे सर्व जिल्ह्याप्रमुख,संपर्कप्रमुख,विभागप्रमुख उपस्थित होते.
शिवसेनेचा नवा नारा..हर हिंदुकी एकही पुकार..पहिले मंदिर फिर सरकार असा नारा शिवसेनेने तयार केला आहे.लक्ष्मण रेषा नजरे समोर ठेऊन येत्या 24 व 25 रोजी शिवसेना महाआरती, रॅली आणि अन्य मार्गांचा प्रभावी अवलंब करून आणि जनजागृती करून अयोध्येत राम मंदिराची आठवण या निमित्याने झोपलेल्या कुंभकर्णाला करून देणार असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी लोकमतशी बोलतांना दिली.
अयोध्या हे तसे छोटे शहर असून राज्यातून मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकारी यांनी अयोध्येला येण्यापेक्षा आपल्या भागात आणि राज्यातील 350 तालुक्यांमध्ये येत्या 24 व 25 नोव्हेंबर रोजी महाआरती,रॅली आणि अन्य कार्यक्रम प्रभावीपणे राबवून अयोध्येत राम मंदिर बांधण्याची मागणी शिवसेना जोरदार शक्ति प्रदर्शन करून मांडणार आहे.तर अयोध्येतील स्थानिक मंडळी हजारोंच्या संख्येने येत्या 24 व 25 नोव्हेंबरला आयोध्येत येणार आहे. नेहमी मराठी भाषेतून भाषण करणारे आणि भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेचे आसूड ओढणारे आणि सभा गाजवणारे उद्धव ठाकरे हे येत्या 25 नोव्हेंबरला अयोध्येत हिंदीत कसे भाषण करतात ,राम मंदिर उभारण्यासाठी ते काय घोषणा करतात याकडे उत्तर प्रदेश आणि देशातील जनतेचे लक्ष लागले आहे.अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा नारा देत आता उतार प्रदेश मध्ये देखिल शिवसेना आपली जोरदार ताकद येथे निर्माण करत असल्याची जोरदार चर्चा आहे.