हा तर शिवसेनेचा राजकीय स्टंट

By admin | Published: February 10, 2017 01:30 AM2017-02-10T01:30:33+5:302017-02-10T01:30:33+5:30

निवडणुकीचा स्टंट म्हणून एखादा पक्ष आम्ही राजीनामा देतो म्हणत असेल, तर मला वाटते त्याला गांभीर्याने घेण्याचे कारण नाही, असा पलटवार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी येथे केला.

This is Shiv Sena's political stunt | हा तर शिवसेनेचा राजकीय स्टंट

हा तर शिवसेनेचा राजकीय स्टंट

Next

वर्धा : निवडणुकीचा स्टंट म्हणून एखादा पक्ष आम्ही राजीनामा देतो म्हणत असेल, तर मला वाटते त्याला गांभीर्याने घेण्याचे कारण नाही, असा पलटवार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी येथे केला.
सेलू तालुक्यातील येळाकेळी येथे पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘आमच्या दोन्ही पक्षांची युती या निवडणुकीमध्ये नाही, परंतु राज्य सरकारमध्ये आम्ही मिळून
काम करतो. शिवसेनेने
भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा काढलेला नाही. राजीनामा खिशामध्ये घेऊन फिरतो, असे ते म्हणत असले, तरीही ते राजीनामा देणार नाही, याची मला खात्री आहे. हे सरकार पाच वर्षे चालणारे
सरकार आहे. सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नाही,’ असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: This is Shiv Sena's political stunt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.