शिवसेनेच्या रडारवर आता पाकिस्तानी अभिनेते, फवाद खान, माहिराला विरोध
By Admin | Published: October 21, 2015 09:23 AM2015-10-21T09:23:50+5:302015-10-21T09:28:16+5:30
पाकिस्तानी अभिनेता फवाद खान व माहिरा खान हे दोघे आता शिवसेनेच्या रडारवर असून त्यांना महाराष्ट्रात चित्रपट प्रमोशन करू देणार नाही, अशी भूमिका सेनेने घेतली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - पाकिस्तानी गायक, कलाकार, क्रिकेटपटूंना कडाडून विरोध दर्शवणा-या शिवेसेनेने आता पाकिस्तानी अभिनेत्यांना टार्गेट केले असून अभिनेता फवाद खान आणिइ माहिरा खान हे दोघे आता सेनेच्या रडारवर आहेत. फवाद आणि माहिराच्या चित्रपटाल शिवसेनेने विरोध दर्शवला असून त्यांना महाराष्ट्रात चित्रपटाचे प्रमोशन करू न देण्याची शपथच शिवसेनने घेतली आहे. याप्रकरणी संबंधित चित्रपट दिग्दर्शकांना शिवसेना पत्र पाठवणार आहे.
फवाद खानने गेल्या वर्षी सोनम कपूर सोबत 'खूबसूरत' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला असून येत्या काळाही त्याच्याकडे अनेक चांगल्या ऑफर्स आहेत. लवकरच तो धर्मा प्रॉडक्शनच्या 'कपूर अँड सन्स' आणि रणबीर कपूर - अनुष्का शर्मा- ऐश्वर्या राय या स्टारकास्टसह 'ए दिल है मुश्किल' या चित्रपटात झळकणार आहे. तर पाकिस्तानमधील प्रसिद्ध अभिनेत्री, सौंदर्यवती माहिरा खान ही बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानसोबत 'रईस' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
आम्ही कोणताही पाकिस्तानी क्रिकेटपटू, अभिनेता किंवा कलाकाराला महाराष्ट्राच्या भूमीवर पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका चित्रपट सेनेचे जनरल सेक्रेटरी अक्षय बर्दापूरकर यांनी मांडली आहे. यापूर्वी शिवसेनेन पाकिस्तानी गझलगायक गुलाम अली खान यांना विरोध दर्शवल्याने त्यांचा मुंबई व पुण्यातील कार्यक्रम रद्द करावा लागला होता.