शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पैशांशिवाय 'आणखीही काही' देण्यात आले; ममतांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 03:53 PM2022-07-04T15:53:07+5:302022-07-04T15:54:59+5:30

महाराष्ट्रातील राजकारणासंदर्भात विचारले असता ममता म्हणाल्या, महाराष्ट्रातील शिंदे सरकार बेकायदेशीर आहे, त्यांनी सरकार जिंकले, पण महाराष्ट्राचे मन जिंकले नाही.

Shiv Sena's rebel MLAs have been given something more than besides money says Mamata Banerjee | शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पैशांशिवाय 'आणखीही काही' देण्यात आले; ममतांचा गौप्यस्फोट

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पैशांशिवाय 'आणखीही काही' देण्यात आले; ममतांचा गौप्यस्फोट

Next

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठे वक्तव्य केले आहे. शिंदे सरकार बेकायदेशीर असल्याचे म्हणत त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. उद्धव सरकार पाडण्यासाठी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पैशां शिवाय आणखीही काही देण्यात आले आहे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. 

महाराष्ट्रातील राजकारणासंदर्भात विचारले असता ममता म्हणाल्या, महाराष्ट्रातील शिंदे सरकार बेकायदेशीर आहे, त्यांनी सरकार जिंकले, पण महाराष्ट्राचे मन जिंकले नाही. बंडखोर आमदारांचा उल्लेख करत ममता म्हणाल्या, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी आसाममधील हॉटेलमध्ये लक्झरी लाइफ एन्जॉय केली. त्यासाठी पैसा कुठून आला? बंडखोर आमदारांना केवळ पैसाच पुरवला गेला नाही, तर इतर अनेक गोष्टी पुरवल्या गेल्या. या सर्व गोष्टी कुठून आल्या? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्या इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह ईस्टमध्ये बोलत होत्या.

'आणखी काही' म्हणजे? सांगू शकाल, अशा आशयाचा प्रश्न केला असता ममता म्हणाल्या, नाही. अनेक वेळा गप्प बसणेच 'गोल्डन' आणि बोलणे 'सिल्व्हर अथवा चांदी' होते. यामुळे मी गप्प राहणेच योग्य आहे.

एवढेच नाही, तर मला माहीत आहे, की भाजप काय करू शकते आणि काय करू शकत नाही. मला काय म्हणायचे आहे, हे सर्वांनाच समजले आहे. मी म्हणते, की m, m, m, m, m, n, n, n....w, w, w, w, w आता लोकांनी स्वतःच अंदाज लावू शकतात. याशिवाय, पुढच्या निवडणुकीत जनता भाजपसाठी बुलडोझर सिद्ध होईल, असेही ममता यांनी म्हटले आहे.
 

Web Title: Shiv Sena's rebel MLAs have been given something more than besides money says Mamata Banerjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.