शिवसृष्टीवर संमतीची मोहोर, येत्या आठवड्यात होणार बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 12:24 AM2017-09-20T00:24:37+5:302017-09-20T00:24:41+5:30

कोथरूड येथे मेट्रो स्थानक व शिवसृष्टी, अशा दोन्ही गोष्टी एकाच जागेवर करणे शक्य आहे; मात्र तसे होतच नसेल तर पुढे बीडीपीची जागा आहे, त्याचा विचार व्हावा; मात्र कोणत्याही परिस्थितीत पुण्यामध्ये शिवसृृष्टी झालीच पाहिजे, यावर मुंबईतील बैैठकीत एकमत झाले़ त्यामुळे आता गेली काही वर्षे मेट्रोच्या या प्रस्तावित स्थानकामुळे रखडलेल्या शिवसृष्टीचा मार्ग मोकळा झाला

Shiv Srishti will be agreed, will be held in the coming week | शिवसृष्टीवर संमतीची मोहोर, येत्या आठवड्यात होणार बैठक

शिवसृष्टीवर संमतीची मोहोर, येत्या आठवड्यात होणार बैठक

Next

पुणे : कोथरूड येथे मेट्रो स्थानक व शिवसृष्टी, अशा दोन्ही गोष्टी एकाच जागेवर करणे शक्य आहे; मात्र तसे होतच नसेल तर पुढे बीडीपीची जागा आहे, त्याचा विचार व्हावा; मात्र कोणत्याही परिस्थितीत पुण्यामध्ये शिवसृृष्टी झालीच पाहिजे, यावर मुंबईतील बैैठकीत एकमत झाले़ त्यामुळे आता गेली काही वर्षे मेट्रोच्या या प्रस्तावित स्थानकामुळे रखडलेल्या शिवसृष्टीचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंबंधी आता महामेट्रोचे वरिष्ठ अधिकारी, नगरविकासचे प्रधान सचिव नितीन करीर व महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यात पुढील आठवड्यात बैठक होणार आहे.
पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पुढाकाराने मुंबईत मंत्रालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. आमदार मेधा कुलकर्णी या वेळी उपस्थित होत्या. बैठकीमध्ये नियोजित शिवसृष्टीचे आरेखन करणारे प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी दोन्ही गोष्टी एकाच जागेवर करता येणे कसे शक्य आहे, याचे सादरीकरण केले. त्यामुळेच करीर व मेट्रोच्याही अधिकाºयांनी असे करता येईल यावर सहमती दर्शवली. प्रस्तावित मेट्रोला नियोजित शिवसृष्टीचा फायदाच होईल, असे मतही व्यक्त करण्यात आले व याविषयावर वरिष्ठ अधिकाºयांसमवेत बैठक घेण्याचेही ठरवण्यात आले. त्यात याविषयाच्या तांत्रिक बाजूचा अभ्यास करण्यात येईल.
बैठकीला महामेट्रोच्या पुण्यातील प्रकल्पाचे प्रमुख रामनाथ सुब्रम्हण्यम, संतोष पाटील, महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे सभापती मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे संजय भोसले, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सतीश कुलकर्णी, शिवसृष्टीसाठी पुढाकार घेणारे माजी उपमहापौर, नगरसेवक दीपक मानकर, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, सुनीता वाडेकर आदी उपस्थित होते.
मेट्रोचा मार्ग कोथरूडपासून पुढे रामवाडीपर्यंत जात आहे. कोथरूड येथे मेट्रोचे स्थानक प्रस्तावित
करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेने त्याच जागेवर नियोजित केलेला शिवसृष्टीचा प्रकल्प मागे पडला. मानकर यांनी त्यासाठी शहरातील शिवप्रेमींना संघटित
करून त्याच जागेवर मेट्रो स्थानकही करावे व शिवसृष्टीही करावी, अशी मागणी केली.
बापट यांनी त्यासाठी पुढाकार घेत मंगळवारी या बैठकीचे आयोजन केले होते. त्यात याविषयावर चर्चा झाली.
कोथरूडमधील ही जागा एकूण २८ एकर आहे. महामेट्रोला ती डेपोसाठी म्हणून हवी आहे. महामेट्रो- नेच नागपूर येथे तयार केलेला डेपो फक्त १८ एकरवर उभा केला आहे. मेट्रोचा मार्ग पुढे वाढणार असून, त्यामुळे डेपो सध्याच्या जागेवर न करता त्यापुढे करता येणे शक्य आहे; तसेच आताही १८ एकर जागेवर मेट्रो
स्थानक व उर्वरित जागेवर शिवसृष्टी करता येणे शक्य आहे, असा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. पुढे असलेल्या बीडीपीच्या जागेवरही चर्चा झाली़
शिवसृष्टीसाठी येणाºया- जाणाºया पर्यटकांचा मेट्रोला फायदाच होईल, असेही या वेळी सांगण्यात आले. मेट्रोच्या रामनाथ सुब्रम्हण्यम यांनी या दोन्ही तोडग्यांना अनुकूलता दर्शवली; मात्र त्याची तांत्रिक बाजू पाहावी लागेल, असे ते म्हणाले. त्यासाठी पुढील आठवड्यात मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, तसेच राज्य सरकारमधील या विषयातील काही तंत्रज्ञ व नितीन करीर, कुणाल कुमार अशी बैठक घेण्याची सूचना बापट यांनी केली. त्यानुसार ही बैठक होणार आहे. त्यात तांत्रिक बाजूंवर चर्चा होईल़
>शिवसृष्टी होणारच
शिवसृष्टी होणे गरजेचेच आहे. हा विषय विनाकारण थांबला होता. म्हणूनच बैठक आयोजित केली होती. त्यात चांगली चर्चा झाली आहे, त्याच जागेवर दोन्ही प्रकल्प करणे शक्य आहे यादृष्टीने विचार झाला आहे. त्यावर आता पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. शक्य असेल तर आहे तीच जागा किंवा पुढे बीडीपीची जागा आहे, त्यावर पण शिवसृष्टीचा हा प्रकल्प व्हावा यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत सर्व अधिकारी याबाबत सकारात्मक दिसले आहेत. याचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. मेट्रोला शिवसृष्टीचा व शिवसृष्टीला मेट्रोचा फायदाच होणार आहे. त्यामुळेच हे दोन्ही प्रकल्प परस्परपुरक आहे व प्रत्यक्षात येणे गरजेचेच आहे, असे मला वाटते.
-गिरीश बापट, पालकमंत्री, पुणे
मेट्रो या मार्गाला ‘वनाज ते रामवाडी मार्ग’ असे म्हटले जात आहे. त्याऐेवजी
हा मार्ग ‘शिवसृष्टी ते रामवाडी’ असा ओळखला जावा तसा बदल महामेट्रोने
आताच करावा, असे पत्र दीपक मानकर यांनी मंत्री बापट, तसेच महामेट्रोच्या अधिकाºयांना दिले.

Web Title: Shiv Srishti will be agreed, will be held in the coming week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.