पट्टा किल्ल्यात शिवकालीन धान्य

By admin | Published: January 1, 2015 02:38 AM2015-01-01T02:38:56+5:302015-01-01T02:38:56+5:30

अकोले तालुक्यातील पट्टा किल्ल्यावरील शिवकालीन गुहांच्या उत्खननात पुरातन वस्तू व धान्य सापडले आहे. या सर्व वस्तू व धान्य शिवकालीन असल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला.

Shiva dynasty in bandh fort | पट्टा किल्ल्यात शिवकालीन धान्य

पट्टा किल्ल्यात शिवकालीन धान्य

Next

प्रकाश महाले - राजूर (अहमदनगर)
अकोले तालुक्यातील पट्टा किल्ल्यावरील शिवकालीन गुहांच्या उत्खननात पुरातन वस्तू व धान्य सापडले आहे. या सर्व वस्तू व धान्य शिवकालीन असल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला.
सन १६७९ साली शिवाजी महाराजांनी जालन्यावर स्वारी केली होती. ती लढाई जिंकून परतत असताना वाटेत मोगल सैन्य असल्याचे त्यांना समजले. शिवाय राजांसह त्यांची फौजही थकलेली होती. त्यामुळे महाराजांनी अकोल्यातील पट्टा किल्ल्यावर आश्रय घेतला. या गडावर महाराज पंधरा दिवसांहून अधिक काळ विश्रांतीस होते.
सध्या या गडावर वन विभाग आणि पट्टेवाडी (तिरडे) स्थानिक वन व्यवस्थापन समितीद्वारे पर्यटनदृष्ट्या विकासकामे सुरू आहेत. गडावर लहानमोठी मिळून एकूण ७० शिवकालीन कुंड आहेत.
संगमनेर उपवनविभाग आणि पट्टेवाडी वनव्यवस्थापन समितीतर्फे गडावरील चार गुहांचे साफसफाईचे काम सध्या सुरू आहे. गुहा क्रमांक एकचे उत्खनन गेल्या आठवड्यापासून सुरू आहे.
या गुहेचे तीन भाग आहेत. मधल्या भागाचे खोदकाम करत असताना सुमारे पंधरा ते अठरा फूट खाली गेल्यानंतर पुरातन जाते, उखळ, मातीची भांडी, प्राण्यांची हाडे, पणत्या आदी वस्तू व नागली, वरईसारखे धान्यही आढळून आले. हे धान्य सुमारे ४५ ते ५० पोते असल्याचे उपविभागीय वन अधिकारी शिवाजी फटांगरे, वनक्षेत्रपाल निलेश आखाडे यांनी सांगितले.

 

Web Title: Shiva dynasty in bandh fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.