जाणता राजा फक्त शिवाजी महाराज; उदयनराजेंची पवारांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 01:15 PM2020-01-14T13:15:55+5:302020-01-14T13:49:56+5:30

उदयन राजे शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले, शिवसेना जेव्हा नाव दिलं तेव्हा वंशजांना विचारायला आला हाेता का ?

Shivaji Maharaj is only janta raja ; Udayan Raja criticizes Pawar | जाणता राजा फक्त शिवाजी महाराज; उदयनराजेंची पवारांवर टीका

जाणता राजा फक्त शिवाजी महाराज; उदयनराजेंची पवारांवर टीका

Next

पुणे : आज अनेकांना जाणता राजाची उपमा दिली जाते. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज आहेत. अशी उपमा काेणालाही दिली जाते त्याचा मी निषेध करताे. जानता राजा उपमा देताना विचार करावा, अशी टीका उदयनराजे भाेसले यांनी शरद पवारांचे नाव न घेता केली.  पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. त्यांनी यावेळी शिवसेना तसेच शरद पवरांवर जाेरदार टीका केली.

उदयनराजे म्हणाले,  जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज. अनेकांना जाणता राजाची उपमा देतात. त्याचाही मी निषेध करताे. जानता राजा उमपा देताना विचार करण्याची गरज आहे. शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले, शिवसेना जेव्हा नाव दिलं तेव्हा वंशजांना विचारायला आला हाेता का ? दादरमधील शिवसेना भवन येथे शिवाजी महाराजांचा फाेटाे बाळासाहेब ठाकरे यांच्या खाली लावण्यात आला आहे, त्यावर शिवसेनेने उत्तर द्यायला हवे. महाविकास आघाडीचे राजकारण चुलीत गेले.  मी आजपर्यंत समाजकारण केलं. महाशिवआघाडी मधून शिव का काढलं ? साेयीप्रमाणे राजकारण करायचं ही यांची लायकी. शिववडा नावाचा वडापाव सुरु करण्यात आला. शिवाजी महाराजांचे नाव वडापावला देता ? आम्ही शिवसेना नावावर कधी हरकत घेतली नाही. महाराजांचे वंशज असलाे तरी विचारांचा वारसा हा सर्व देशाला लाभला आहे. देशातील प्रत्येकजण शिवाजी महाराजांचे माेठे कुटुंब आहे. महाराजांनी कधी जातीभेद केला नाही. 

छत्रपती शिवाजी महाराजांशी काेणीही बराेबरी करु शकत नाही : उदयन राजे 

आमदार, खासदार यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा असतात त्यांना कोणी जाब विचारणार आहे की नाही ? यापुढे महाराजांचे नाव घेताना तसे वागा अन्यथा घेऊ नका. तुमच्या अपयशाचे, गैरवावहाराचे खापर आमच्यावर फोडू नका. महाराज सर्वांचे आहेत, कुटुंबाचे नाहीत. आजपर्यंत महाराजांच्या नावाचे फक्त राजकारण केले. आज चार हजार जाती झाल्या आहेत. लोक जातीवर मतदान करतात. भिवंडी दंगल, इतर जातीय दंगली घडल्या. जाणते राजे म्हणवून घेणारे राजकारणापलिकडे काही विचार करत नाहीत.

Web Title: Shivaji Maharaj is only janta raja ; Udayan Raja criticizes Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.