शिवपुतळा दुर्घटना : जयदीप आपटे, चेतन पाटील यांना १० सप्टेंबरपर्यंत कोठडी, निष्कलंक असता तर फरार नसता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 07:08 AM2024-09-06T07:08:30+5:302024-09-06T07:11:01+5:30

Shivaji Maharaj Statue Collapse: राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना गुरुवारी न्यायालयाने १० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Shivaji Maharaj Statue Collapse: Jaideep Apte, Chetan Patil remanded till September 10, if they were clean they would not have absconded | शिवपुतळा दुर्घटना : जयदीप आपटे, चेतन पाटील यांना १० सप्टेंबरपर्यंत कोठडी, निष्कलंक असता तर फरार नसता

शिवपुतळा दुर्घटना : जयदीप आपटे, चेतन पाटील यांना १० सप्टेंबरपर्यंत कोठडी, निष्कलंक असता तर फरार नसता

 मालवण (जि. सिंधुदुर्ग) : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना गुरुवारी न्यायालयाने १० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
आपटे याच्या वतीने ॲड. गणेश सोहनी यांनी न्यायालयाला सांगितले की, या गुन्ह्यात दाखल केलेली शारीरिक दुखापतीसंदर्भातील कलमे चुकीची आहेत, तर पाटील याचे वकील उपस्थित नसल्याने त्यांच्या वतीने लेखी बाजू मांडण्यात आली. सरकारी पक्षाचे  अभियोक्ता ॲड. तुषार भणगे म्हणाले, आपटे निष्कलंक असता तर इतके दिवस फरार राहिला नसता.  

Web Title: Shivaji Maharaj Statue Collapse: Jaideep Apte, Chetan Patil remanded till September 10, if they were clean they would not have absconded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.