Video: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला, शिवप्रेमींमध्ये नाराजी, विधानसभेत मुद्दा उचलला
By प्रविण मरगळे | Published: March 2, 2021 05:42 PM2021-03-02T17:42:04+5:302021-03-02T17:45:05+5:30
ज्यांच्यामुळे महाराष्ट्र घडला आहे, अशा छत्रपती शिवाजी महाराज यांचा विषय विधानसभेत मांडू न देणे हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे
मुंबई – काही महिन्यांपूर्वी कर्नाटकात आणि मध्य प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यामुळे मोठा वादंग निर्माण झालं होतं, कोणतीही पूर्वसूचना न देता प्रशासनाने महाराजांचा पुतळा हटवल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली होती, आता हीच घटना महाराष्ट्रच्या लातूर जिल्ह्यात घडली आहे, हा मुद्दा भाजपाचे नेते आणि माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी विधानसभेत मांडत महाराष्ट्र सरकार निजामी सरकार असल्याचं घणाघात केला.(BJP Sambhaji Patil Nilangekar Target Thackeray Government)
याबाबत विधानसभेच्या सभागृहात संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले की, ज्यांच्यामुळे महाराष्ट्र घडला आहे, अशा छत्रपती शिवाजी महाराज यांचा विषय विधानसभेत मांडू न देणे हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे. लातूरच्या रायवाडी येथे १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा गावकऱ्यांनी वर्गणी काढून उभारला होता, परंतु प्रशासनाने कोणाचीही याबाबतीत एकही तक्रार नसताना हा पुतळा काढून टाकला असं त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र सरकार हे निजामी सरकार..
— Sambhaji Patil Nilangekar (@sambhajipatil77) March 2, 2021
ज्यांच्यामुळे हा महाराष्ट्र घडला आहे, अशा आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा विषय विधान सभेमध्ये मांडू न देणे हा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा अवमान आहे..!#रायवाडी_शिवस्मारकpic.twitter.com/7yoild0qh0
त्याचसोबत ज्यावेळी कर्नाटकात अशाप्रकारे महाराजांचा पुतळा हटवला होता त्यावेळी सरकारसोबत आम्हीसुद्धा त्याठिकाणी जाऊन छत्रपतींचा पुतळा पुन्हा बसवला, मात्र महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा हटवण्याचं काम या ठाकरे सरकारने केलं आहे, येत्या १५ दिवसांत जर सरकारने शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसवला नाही तर लातूरसह संपूर्ण मराठवाड्यात याचे तीव्र पडसाद उमटतील असा इशारा भाजपा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सरकारला दिला.