शिवाजी विद्यापीठाची दुष्काळग्रस्तांना मदत

By admin | Published: May 2, 2016 12:28 AM2016-05-02T00:28:29+5:302016-05-02T00:28:29+5:30

शिवाजी विद्यापीठाने सामाजिक बांधिलकीची प्रचिती देताना विद्यापीठ कार्यक्षेत्रातील दुष्काळग्रस्त भागातील नागरिक आणि त्यांच्या जनावरांसाठी सुमारे ५७ क्विंटल

Shivaji University helps drought victims | शिवाजी विद्यापीठाची दुष्काळग्रस्तांना मदत

शिवाजी विद्यापीठाची दुष्काळग्रस्तांना मदत

Next

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने सामाजिक बांधिलकीची प्रचिती देताना विद्यापीठ कार्यक्षेत्रातील दुष्काळग्रस्त भागातील नागरिक आणि त्यांच्या जनावरांसाठी सुमारे ५७ क्विंटल धान्य आणि ३ ट्रक चाऱ्याचे वितरण केले.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त आटपाडी आणि जत तालुक्यांची पाहणी करण्याबरोबरच ४ गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन मदतीचे वाटप केले. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन विद्यापीठाने विद्यार्थी कल्याण विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या माध्यमातून संलग्नित महाविद्यालयांना मदतीसाठी आवाहन केले होते. तसेच, विद्यापीठ परिसरातही गवत व चारा संकलन केले होते. तडवळे (ता. आटपाडी) येथील ४५० कुटुंबांना सुमारे २२ क्विंटल तांदळाचे वाटप करण्यात आले. माडगुळे (ता. आटपाडी) येथील १०० कुटुंबे आणि त्यांची जनावरे यांच्यासाठी १० क्विंटल धान्य व १० क्विंटल सरकी पेंड देण्यात आली. वज्रवाड (ता. जत) येथील १०० कुटुंबे व त्यांच्या जनावरांसाठी १० क्विंटल धान्य व २ ट्रक चारा-गवत देण्यात आले. खिलारवाडी (ता. जत) येथील ५० कुटुंबे व त्यांच्या जनावरांसाठी ५ क्विंटल धान्यासह १ ट्रक चारा देण्यात आला. (प्रतिनिधी)

तडवळेतील ४५० कुटुंबांना २२ क्विंटल तांदळाचे वाटप

माडगुळेतील १०० कुटुंबांना १० क्विंटल धान्य व १० क्विंटल सरकी पेंड

वज्रवाडातील १०० कुटुंबांना १० क्विंटल धान्य व २ ट्रक चारा-गवत

खिलारवाडीतील ५० कुटुंबांना ५ क्विंटल धान्यासह १ ट्रक चारा

Web Title: Shivaji University helps drought victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.