प्रभू रामांनी आराधना केलेले धुपेश्वर येथील शिवलिंग!

By admin | Published: December 30, 2016 06:11 PM2016-12-30T18:11:21+5:302016-12-30T18:11:21+5:30

धुपेश्वर या तीर्थक्षेत्राचा गत दोन वर्षांपासून जीर्णोद्धाराचे कार्य हे एका भोपाळस्थित भाविकाकडून स्वयंस्फूर्तीने केले जात आहे.

Shivalinga in Dhupeshwar worshiped Lord Rama! | प्रभू रामांनी आराधना केलेले धुपेश्वर येथील शिवलिंग!

प्रभू रामांनी आराधना केलेले धुपेश्वर येथील शिवलिंग!

Next

ऑनलाइन लोकमत
मलकापूर, दि. 30 - संपूर्ण मलकापूर शहराची तृष्णा भागवित असलेल्या पूर्णामायीच्या तिरावर वसलेल्या धुपेश्वर या तीर्थक्षेत्राचा गत दोन वर्षांपासून जीर्णोद्धाराचे कार्य हे एका भोपाळस्थित भाविकाकडून स्वयंस्फूर्तीने केले जात आहे. या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी आराधना केल्यामुळे या तीर्थस्थळाला वेगळेच महत्व आहे.
मराठवाडा, खान्देश व विदर्भाचा मध्यबिंदू असलेल्या मलकापूर तालुक्यातील मौजे हरसोडा ग्रामपंचायत अंतर्गत धुपेश्वर या तीर्थक्षेत्राचा परिसर असून या तीनही भागातील अनेक भाविक भक्तांची या तीर्थक्षेत्रावर मोठी श्रद्धा आहे. या भागातील भाविक मोठ्या संख्येत या तीर्थक्षेत्राशी जुळले आहेत. वनवासी जात असताना प्रभू रामचंद्र स्थापित शिवलिंग येथे असून, याकाळी रामाने येथे आराधना केली आहे. घनदाट अरण्याचा हा परिसर असताना येथे श्रीविठ्ठल लहरी पुजारी बाबांनी शिवलिंगाची पुजा व देखभाल मनोभावे केली. या बाबांचे अनेक चमत्कार त्या काळी भाविकांना प्रत्यक्ष अनुभवास आले.
बाबांमुळे या तीर्थक्षेत्राची महती वाढली. दरम्यान बोदवड तालुक्यातील नाडगाव येथील सदगृहस्थ रावसाहेब बाबुराव पाटील यांनी प्रथम या मंदिराचा सन १९३९ साली जीर्णोद्धार केला. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे ते सदगृहस्थ काका होते. पुढे सन १९४६ साली मंदिराचे श्रीविठ्ठल लहरी पुजारी बाबांनी मंदिराजवळ जिवंत समाधी घेतली. त्यांच्या पश्चात हभप रामभाऊ पुजारी बाबांनी मंदिराचे सेवाकार्य जोपासले. सन २०१४ मध्ये २९ जुलै रोजी रामभाऊ महाराजांचे दु:खद निधन झाले. त्यानंतर आता मंदिराच्या सेवाकार्याची जबाबदारी श्री पुंजाजी महाराज रायपुरे हे सांभाळीत आहेत.
श्रावण महिन्यात दर सोमवारी या ठिकाणी भाविक भक्तांची मोठी गर्दी उसळते. मनोकामना पूर्ण झालेल्या भक्तांकडून रोडग्यांचा भंडाराही होतो. सद्यस्थितीत संस्थानचे अध्यक्षपद अ‍ॅड. महादेवसिंह रावळ यांचेकडे असून ते नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ यांचे वडील आहेत. तर व्यवस्थापक म्हणून तेजराव रायपुरे हे जबाबदारी सांभाळीत आहेत. गत दोन वर्षांपासून त्या भोपाळस्थित भाविकांच्या पुढाकारातून व आर्थिक पाठबळातून मंदिराला भव्यदिव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. या परिसरात माजी नगराध्यक्ष नारायणदास निहलाणी यांनी त्यांच्या मातोश्री स्मृतिप्रीत्यर्थ भक्तांकरिता थंड व शुद्ध पेयजलाची यंत्रणा उभारून दिली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतोषराव रायपुरे यांनी तत्कालीन ग्रामविकास मंत्री जयंतराव पाटील यांचे माध्यमातून या तीर्थक्षेत्राच्या विकासाकरीता १ कोटी ३५ लाख रूपयांचा निधी मिळवून या निधीतून ५०-५० लाखांचे दोन भक्तनिवास, २५ लाखांचे स्नानगृह व स्वच्छतागृहे तसेच १६ लाखाची पाण्याची टाकी आदी सुविधांची निर्मिती केली आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत १० व १२ लक्ष रुपयांच्या वाहन तळाची निर्मिती करीत संतोषराव रायपुरे यांनी नदीवर घाट निर्मिती, परिसरात विद्युत काम व पेव्हर ब्लॉक अशा विविध दोन कोटी रुपयांच्या विकासकामांचा प्रस्तावसुद्धा त्यांनी जि.प. मार्फत केंद्रीय ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचेकडे दाखल केला आहे हे विशेष.

Web Title: Shivalinga in Dhupeshwar worshiped Lord Rama!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.