गाव तिथे भाजपाच्या शिवार सभा

By admin | Published: May 13, 2017 02:17 AM2017-05-13T02:17:20+5:302017-05-13T02:17:20+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी

Shivar Sabha of BJP there | गाव तिथे भाजपाच्या शिवार सभा

गाव तिथे भाजपाच्या शिवार सभा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर २५ ते २८ मे असे चार दिवस प्रत्येक गावात शिवार संवाद सभा होणार आहेत.
भाजपाचे चार हजार लोकप्रतिनिधी या संवाद मोहिमेत सहभागी होणार आहेत. या उपक्रमामध्ये भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी गावागावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेसाठी कार्यकर्त्यांसह श्रमदान करणार आहेत. या संवाद उपक्रमात पहिल्या दिवशी गुरुवार, २५ मे रोजी एकाच दिवशी १६ हजार गावांमध्ये १६ हजार सभा होणार आहेत.
पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्यात लातूर जिल्ह्यातील गावांमध्ये तर प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे उत्तर महाराष्ट्रात नंदूरबार जिल्ह्यात आदिवासी गावांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधतील. त्याच दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, चंद्रपूर जिल्ह्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, कोकणात शिक्षणमंत्री विनोद तावडे तसेच बीड जिल्ह्यात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
जबाबदारी निलंगेकर, कुटेंकडे0-
कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. डॉ. संजय कुटे यांच्यावर शेतकरी संवाद सभांच्या नियोजनाचे जबाबदारी पक्षाने दिली आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधी सकाळी दोन व सायंकाळी दोन सभांमध्ये संवाद करेल. हा उपक्रम रविवार, २८ मे रोजी पूर्ण होईल तोपर्यंत प्रत्येक गावातील शेतकऱ्यांशी भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी संवाद केलेला असेल.

Web Title: Shivar Sabha of BJP there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.