शिवरायांचा आशीर्वाद फुकटात?
By admin | Published: October 5, 2014 01:57 AM2014-10-05T01:57:11+5:302014-10-05T01:57:11+5:30
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाला 2क्क् कोटी रुपये देणा:या केंद्र शासनाने मुंबईतील शिवरायांच्या स्मारकाला एक रुपयासुद्धा दिला नाही.
Next
>नारायण राणो : मुंबईचे आर्थिक खच्चीकरण करण्याचा मोदींचा डाव
सांगली : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाला 2क्क् कोटी रुपये देणा:या केंद्र शासनाने मुंबईतील शिवरायांच्या स्मारकाला एक रुपयासुद्धा दिला नाही. त्यामुळे शिवरायांचा आशीर्वाद फुकटात कसा मिळेल, असा सवाल काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणो यांनी भाजपाला सांगलीत केला़
कॉँग्रेसचे उमेदवार मदन पाटील यांच्या प्रचारार्थ वसंतदादा समाधीस्थळी आयोजित सभेत ते बोलत होत़े यावेळी माजी वनमंत्री पतंगराव कदम, माजी मंत्री प्रतीक पाटील, अभिनेत्री नगमा, महापौर कांचन कांबळे उपस्थित होते.
राणो म्हणाले की, मंडप नाही, नवरीचा पत्ता नाही आणि भाजपा, सेनेचे नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. शिवसेनेने 48 वर्षे केवळ मराठी माणूस आणि मुंबईच्या जोरावर दुकानदारी केली. भाजपामधील नेत्यांना मराठीत शुद्ध बोलताही येत नाही. महाराष्ट्रात एकही लायक नेता भाजपाकडे नसल्याने त्यांच्या जाहिरातींवर केवळ मोदीच दिसत आहेत. उद्धव ठाकरेंना विधानसभा तरी माहीत आहे का? विधानसभेत किती विभाग असतात, याचीही त्यांना कल्पना नाही. तरीही असे लोक आता मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहू लागले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
संयुक्त महाराष्ट्र स्थापनेवेळी मोरारजी देसाई यांचा मुंबई गुजरातला जोडण्याचा प्रयत्न होता. राज्यातील 1क्5 हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली. त्यावेळी मुंबई मिळाली नाही, म्हणून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईला आर्थिकदृष्टय़ा कमकुवत करण्याचे षड्यंत्र रचत असल्याचा आरोप राणो यांनी केला़
मुंबईतील 75 हजार कोटी रुपयांची 18क्क् एकर जमीन घेण्यासाठी गुजरातमधील उद्योजक असलेला मोदींचा एक मित्र प्रयत्नशील आहे. भाजपाचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत.
राजनाथ सिंह यांच्यापासून अनेक भाजपा नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, तरीही ते मोठय़ा पदांवर आहेत. कॉँग्रेसच्या अशा वादग्रस्त मंत्र्यांना आणि पदाधिका:यांना तत्काळ राजीनामे द्यावे लागले होते.