पुण्यातील दुर्घटनेबद्दल, शिवराज चौहान यांनी व्यक्त केलं दु:ख
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 02:10 PM2019-06-29T14:10:32+5:302019-06-29T22:33:03+5:30
देशभरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. शिवराज चौहान यांनी सुद्धा ट्विट करून दु:ख व्यक्त केलं.
मुंबई - कोंढवा परिसरात इमारतीची संरक्षण भिंत रात्री दीड वाजण्याच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेत एकूण १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मातीच्या ढिगाऱ्याखालून ३ जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. या दुर्घटनेनंतर देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते शिवराज सिंह चौहान यांनी पुण्याच्या दुर्घटनेवरून दु:ख व्यक्त केले आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंट वरून याबाबत त्यांनी पोस्ट केली आहे.
पुण्यातील कोंढव्यातील सोमजी पेट्रोल पंपाजवळील आल्कर स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास कोसळून १५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. देशभरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. शिवराज चौहान यांनी सुद्धा ट्विट करून दु:ख व्यक्त केलं. पुण्यात संरक्षण भिंत पडल्याने या दुर्घटनेत मोठ्याप्रमाणात नागरिकांना आपला जीव गमवावे लागले आहेत. तर या घटनेत जखमी लोकांनी लवकर बरं व्हावं याकरता प्रार्थना करतो, असे चौहान म्हणाले.
महाराष्ट्र के पुणे में कल दीवार गिरने से बड़ी संख्या में लोगों के हताहत होने का दुःखद समाचार मिला। ईश्वर से दिवंगत आत्माओं की शांति और घायलों के शीघ्र स्वस्थ होने की प्रार्थना करता हूँ।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) June 29, 2019
पुण्यातील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदना व्यक्त केली असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. तर, पुणे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनातून मृतांच्या कुटुंबियांना ही मदत जाहीर करण्यात आली. पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत माहिती दिली आहे.